IPL 2022, GT vs LSG Match Highlights : राहुल तेवातिया-डेविड मिलरची विस्फोटक खेळी, गुजरातचा पाच गड्यांनी विजय

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरात आणि लखनौ या आयपीएलमधील दोन नव्या संघामध्ये आज लढत होणार आहे. हार्दिक पांड्याकडे गुजरातचं तर के.एल राहुलकडे लखनौ संघाची जबाबदारी सांभाळत आहेत. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Mar 2022 11:42 PM
IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरातच्या समर्थकांचं आणि खेळाडूंचं सेलिब्रेशन

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरातच्या समर्थकांचं आणि खेळाडूंचं सेलिब्रेशन


 





IPL 2022, GT vs LSG Match Live Update : राहुल तेवातिया-डेविड मिलरची विस्फोटक खेळी, गुजरातचा पाच गड्यांनी विजय

IPL 2022, GT vs LSG : राहुल तेवातियाच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर गुजरातने पाच गड्यांनी लखनौवर विजय मिळवला. राहुल तेवातियाने 24 चेंडूत 40 धावांची विस्फोटक खेळी केली.  या खेळीदरम्यान राहुलने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. हार्दिक पांड्या, मॅथ्यू वेड आणि डेविड मिलर यांच्या छोटेखानी खेळीला राहुल तेवातियाच्या विस्फोटक खेळीची जोड मिळाली. त्याबळावर गुजरातने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. लखनौ संघाची सुरुवात निराशाजनक झाली आहे.

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरातला पाचवा धक्का, डेविड मिलर बाद

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : मोक्याच्या क्षणी आवेश खान याने मिलरला बाद करत लखनौला सामन्यात जिवंत ठेवलं आहे. मिलर 23 धावा काढून बाद झाला. गुजरात टायटन्सला 15 चेंडूत 8.4 rpo प्रति ओवर सरासरी ने 21 धावांची गरज 



 

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : राहुल-मिलरची फटकेबाजी, लखनौच्या अडचणी वाढल्या

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : राहुल-मिलरने तुफान फटकेबाजी सुरु केली आहे. त्यामुळे लखनौच्या अडचणी वाढल्या आहेत. गुजरातला विजयासाठी 22 चेंडूत 39 धावांची गरज

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : सामना रोमांचक स्थितीत

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे.  गुजरात टायटन्स ला 30 चेंडूत 13.6 rpo प्रति ओवर सरासरी ने 68 धावांची गरज आहे. गुजरातने 15 षटकानंतर 4 बाद 91 धावा केल्या आहेत.

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरातला चौथा धक्का, मॅथ्यू वेडला दीपक हुड्डाने पाठवलं माघारी

IPL 2022, GT vs LSG Match Live Update :  तुफानी फलंदाजीनंतर दीपक हुड्डाने गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. दीपक हुड्डाने जम बसेलेल्या मॅथ्यू वेडला त्रिफाळाचीत बाद करत लखनौला चौथं यश मिळवून दिलेय. गुजरात चार बाद 78 धावा

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : हार्दिक पांड्याला क्रृणालने केले बाद, गुजरातला तिसरा धक्का

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : सुरुवातीला झटपट विकेट पडल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि विकेटकिपर मॅथ्यू वेड यांनी संघाचा डाव सावरला होता. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली होती.  हार्दिक पांड्याला क्रृणाल पांड्याने बाद करत जमलेली जोडी फोडली आहे. सलामी फलंदाज शुभमन गिल आणि विजय शंकर स्वस्तात माघारी परतले होते. गुजरातने तीन बाद 72 धावा केल्या आहेत.

IPL 2022, GT vs LSG : गुजरातला दुसरा धक्का,  विजय शंकर चार धावांवर बाद 

शुभम गिल नंतर गुजरातला दुसरा धक्का,  विजय शंकर चार धावांवर बाद झाला.  

IPL 2022, GT vs LSG :  गुजरातला पहिला धक्का,  शुभम गिल शुन्यावर बाद

IPL 2022, GT vs LSG :  गुजरातला पहिला धक्का,  शुभम गिल शुन्यावर बाद, गुजरातच्या एका षटकानंतर एक बाद सात धावा 

IPL 2022, GT vs LSG : दीपक हुड्डा-आयुष बडोनीची वादळी खेळी, पडझडीनंतर लखनौची 158 धावांपर्यंत मजल

IPL 2022, GT vs LSG : अष्टपैलू दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावार लखनौ संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या आहेत. गुजरात संघाला विजयासाठी 159 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यानंतर लखनौ संघाचा डाव कोसळला होता. आघाडीची फळी कोसळल्यानंतर दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावार लखनौ संघाने सन्माजनक धावसंख्या उभारली. दीपक हुड्डाने आपल्या अर्धशतकी खेळीत 2 षटकार आणि सहा चौकार चोपले. तर आयुष बडोनी याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. बडोनीने 41 चेंडूत ताबडतोड 54 धावांची खेळी केली.  गुजरातकडून शमी सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला आहे. शमीने तीन विकेट घेतल्या. तर वरुण वरुण अरोन याने दोन विकेट घेतल्या. तर  राशिद खानला एक विकेट मिळाली.  हार्दिक पांड्या आणि लॉकी फर्गुसन यांची विकेटची पाटी कोरीच राहिली.

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : आयुष बडोनीचे अर्धशतक

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : युवा आयुष बडोनीने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी करत संगाचा डाव सावरला. बडोनीने लॉकी फर्गुसनला षटकार लगावत अर्थशतक पूर्ण केले. बडोनीने 38 चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने अर्धशतक केले. 


 

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : लखनौला पाचवा धक्का, दीपक हुड्डा बाद

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : लखनौला पाचवा धक्का, दीपक हुड्डा बाद , लखनौ 16 षटकानंतर पाच बाद 116 धावा




IPL 2022, GT vs LSG Match Live Update :  दीपक हुड्डा आणि आयुष बडोनीने लखनौचा डाव सावरला 

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांनी लखनौचा डाव सावरला आहे. लखनौने दहा षटकानंतर चार बाद 47 धावा केल्या आहेत. गार्दिक पांड्यानो दोन षटकं गोलंदाजी केली.

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : शमी ऑन फायर! लखनौची दयनीय अवस्था

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : शमी ऑन फायर! मोहम्मद शमीने लखनौला दिला आणखी एक धक्का, लखनौची दयनीय अवस्था, लखनौचे 29 धावात चार गडी बाद



 IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरातचा भेदक मारा, लखनौला तिसरा धक्का

 IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरातचा भेदक मारा, लखनौला तिसरा धक्का, लुईस 10 धावा काढून बाद, लखनौच्या तीन बाद 20 धावा

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : शामीच्या गोलंदाजीपुढे लखनौची दयनीय अवस्था

 IPL 2022, GT vs LSG Match Live Update : शामीच्या गोलंदाजीपुढे लखनौची दयनीय अवस्था 





IPL 2022, GT vs LSG Match Live Update : शामीचा भेदक मारा, लखनौला दुसरा धक्का

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : शामीचा भेदक मारा, लखनौला दुसरा धक्का, राहुलनंतर डिकॉकलाही केले बाद. लखनौच्या दौन बाद13 धावा

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : लखनौला पहिला धक्का, कर्णधार राहुल बाद

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : लखनौला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार राहुल खातेही न उघडता बाद झालाय. मोहम्मद शामीने पहिल्याच चेंडूवर केले बाद

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : राहुल-डिकॉक फंलदाजीसाठी मैदानावर

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : राहुल-डिकॉक फंलदाजीसाठी मैदानावर उतरले आहेत. गुजरातकडून शमीने पहिलं षटक घेऊन आलाय

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : लखनौचे 11 नवाब कोण?

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : केएल राहुल (कर्णधार), मनिष पांडे, क्रृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, इविन लुईस, डी. चमिरा, दीपक हुड्डा, ए बिदोनी, एम. खान, आवेश खान, रवि बिश्नोई 





IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरातच्या संघात कुणाला संधी?

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिलं, मॅथ्य वेड (विकेटकिपर), विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवातिया, ए मनोहर, लॉकी फर्गुसन, राशिद खान, मोहम्मद शामी, वरुण अरॉन 



IPL 2022, GT vs LSG Match Live Update : हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. 

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : थोड्याच वेळात होणार नाणेफेक

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : थोड्याच वेळात होणार नाणेफेक





IPL 2022, GT vs LSG Match Live Update : थोड्याच वेळात सुरु होणार सामना

IPL 2022, GT vs LSG Match Live Update :  थोड्याच वेळात सुरु होणार सामना, हार्दिक आणि राहुलमध्ये होणार सामना, कोण मारणार बाजी?





IPL 2022, GT vs LSG Match Live Update : कुठे पाहता येणार सामना?

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरात विरुद्ध लखनौ यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : कधी आहे सामना?

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : आज 28 मार्च रोजी होणारा हा गुजरात विरुद्ध लखनौ यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.




 


IPL 2022, GT vs LSG Match Live Update : कुठे आहे सामना?

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे.

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : लखनौचे संभाव्य अंतिम 11

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : केएल राहुल (कर्णधार), क्विंंटन डि कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, मनन वोहरा, जेसन होल्डर, क्रुणाल पंड्या, शाहबाज नदीम, अंकित राजपूत, आवेश खान, रवी बिश्नोई

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरातचे संभाव्य अंतिम 11

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, रहमानुल्लाह गुरबाज, अभिनव मनोहर, विजय शंकर, ऋद्धिमान साहा, राशिद खान, डेविड मिलर, आर किशोर, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्यूसन

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : लखनौचे 'हे' खेळाडू नसतील पहिल्या सामन्यात

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : इंग्लंडच्या वेस्टइंडीज दौऱ्यावर दुखापतीमुळे मार्क वुड IPL 2022 मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या अँड्रयू टायला संघात घेतलं आहे. तर दुसरीकडे जेसन होल्डर आणि काइल मेयर्स यांचीही आयपीएलच्या पहिल्या आठवड्यानंतर संघात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. कारण संध्या ते दोघेही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेस्टइंडीज संघात खेळत आहेत. मार्कस स्टॉयनीसही पाकिस्तान दौऱ्यामुळे या सामन्याला मुकणार आहे.

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरातकडून 'हे' खेळाडू मुकणार पहिला सामना

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज रहमानुल्ला गुरबाज याने इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय याच्या जागी संघात एन्ट्री केली आहे. पण नुकताच संघात आल्याने तो पहिल्या सामन्याला मुकू शकतो. तर दुसरीकडे इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी सामने सुरु असल्याने वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफ देखील पहिल्या सामन्याला मुकणार आहे. 

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : राशिद खानवर मोठी जबाबदारी

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : स्टार खेळाडू राशिदवर नुकतीच संघाने एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्याला संघाचा उपकर्णधार ही जबाबदारी देण्यात आली आहे. गुजरात टायटन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन ही माहिती शेअर केली आहे.  गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हार्दीक आणि राशिदचा (Rashid Khan) फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'आमच्यासाठी या हंगामात राशिद खान उपकर्णधार असणार आहे.' गुजरातने महालिलावापूर्वीच तब्बल 15 कोटी मोजत राशिदला संघासाठी करारबद्ध केलं होतं.  

पार्श्वभूमी

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : आयपीएलच्या 15 हंगामात 8 जागी 10 संघ सामिल झाले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघाच्या एन्ट्रीमुळे आता स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. दरम्यान या नव्याने सामिल झालेल्या दोन्ही संघामध्ये आज लढत असणार असून पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत. यावेळी हार्दीक पंड्या गुजरातचं तर राहुल लखनौचं कर्णधारपद सांभाळणार आहे.


गुजरात आणि लखनौ संघाचा विचार करता या दोन्ही संघानी यंदा पहिल्यांदाच स्पर्धेत सहभाग घेतला असला तरी दोन्ही संघातील खेळाडू मात्र कमालीचे अनुभवी आहेत. लखनौचा कर्णधार राहुलला याआधी पंजाब संघाचं नेतृत्त्व करण्याचा अनुभव देखील आहे. तर दुसरीकडे हार्दीक पहिल्यांदाच कर्णधार म्हणून आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघाकडे गोलंदाजीमध्येही बरेच पर्याय असल्याने सामना चुरशीचा होणार हे नक्की.


असा आहे गुजरातचा संघ -
हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी),  वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये


कसा आहे लखनौ संघ ? -
केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, आवेश खान, अंकित राजपूत, कृष्णप्पा गौतम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मनन खान, आयुष बधोनी, काइल मायर्स, कर्ण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव आणि बी साई सुदर्शन.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.