IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामची सुरुवात झाली असून अगदी चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत. गुरुवारी देखील चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनौ यांच्यात एक चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत चेन्नईचं 211 धावांच मोठं आव्हान लखनौने 6 ग़डी राखून पार केलं. दरम्यान सामन्यात चेन्नई संघाचा पराभव झाला असला तरी त्यांचा स्टार खेळाडू ब्राव्होने मात्र मलिंगाचा एक दमदार असा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. ब्राव्हो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत आता मलिंगाच्या पुढे जात एक नंबरवर आला आहे.
चेन्नई विरुद्ध लखनौ सामन्यात मलिंगाने दीपक हुडाची विकेट घेताच आयपीएलमधील आपली 171 वी विकेट घेत मलिंगाला मागे टाकलं आहे. याआधी केकेआरविरुद्ध 3 विकेट्स घेत त्याने मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. ब्राव्होने ही कामगिरी 152 सामन्यात केली असून मलिंगाने अवघ्या 122 सामन्यात ही कामगिरी केली होती. दरम्यान मलिंगा निवृत्त झाला असल्याने आता ब्राव्होचा रेकॉर्ड कोण मोडेल? याकडे अनेकांचे लक्ष आहे.
लखनौचा दमदार विजय
कर्णधार के.एल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांच्या तुफानी सलामीनंतर एविन लुईसच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर लखनौसंघाने 211 धावांचे आव्हान सहा गाडी राखून सहज पार केले. लखनौने 19.3 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या. लखनौकडून क्विंटन डिकॉकचे आणि लुईस यांनी अर्धशतकी खेळी केली. डिकॉकने 61 तर लुईसने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर राहुलने 40 धावांची छोटेखानी खेळी केली. आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लखनौचा हा पहिला विजय आहे. लखनौला पहिल्या सामन्यात गुजरातकडून पराभव स्विकारावा लागला होता. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022, KKR vs PBKS : कोलकात्यासमोर आज पंजाबचे आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
- IPL 2022, SRH vs RR: राजस्थानचा हल्लाबोल! संजूची विस्फोटक फलंदाजी, चहलचा भेदक मारा, हैदराबादचा 61 धावांनी पराभव
- IPL 2022, LSG vs CSK: लखनौचा सुपर विजय, चेन्नईचा सहा गड्यानी पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha