DC vs RCB, Match Live Update : दिल्लीचा पराभव, आरसीबीचा 16 धावांनी विजय

IPL 2022 : आज पार पडणारा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध बंगळुरु यांच्यातील सामना मुंबईच्या प्रसिद्ध अशा वानखेडे स्टेडियमध्ये पार पडणार आहे.

abp majha web team Last Updated: 16 Apr 2022 11:27 PM
DC vs RCB, Match Live Update : दिल्लीचा पराभव, आरसीबीचा 16 धावांनी विजय

DC vs RCB, Match Live Update :   रॉयल चॅलेंजर बेंगलोरनं दिल्लीचा 16 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह आरसीबी गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. आरसीबीने सहा सामन्यात चार विजय मिळवले आहेत. 

DC vs RCB, Match Live Update : लॉर्ड शार्दुल ठाकूर बाद, हेजलवूडने दिला धक्का

DC vs RCB, Match Live Update :  हेजलवूडने शार्दुलला बाद करत दिल्लीला सातवा धक्का दिला आहे. दिल्लीला विजयासाठी 11 चेंडूत 34 धावांची गरज आहे. अक्षर पटेल मैदानावर आहे. 

DC vs RCB, Match Live Update : सामना रोमांचक स्थितीत

DC vs RCB, Match Live Update : दिल्ली आणि आरसीबीचा सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे. दिल्लीला विजयासाठी 12 चेंडूत 34 धावांची गरज आहे. अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर मैदानावर आहेत.

DC vs RCB, Match Live Update : विराट कोहलीचा भन्नाट झेल, पंत बाद

DC vs RCB, Match Live Update :  मोहम्मद सिराजच्या चेंडूवर विराट कोहलीने ऋषभ पंतचा भन्नाट झेल घेतला. पंतच्या रुपाने दिल्लीला पाचवा धक्का बसला. पंत 17 चेंडूत 34 धावा काढून बाद. 

DC vs RCB, Match Live Update : दिल्लीच्या अडचणी वाढल्या, ललीत यादवही बाद

DC vs RCB, Match Live Update : हेजलवूडने एकाच षटकात दोन विकेट घेत दिल्लीच्या अडचणी वाढवल्या. पॉवेलनंतर ललीत यादवही बाद. ललीत यादव एक धाव काढून बाद झाला. दिल्ली पाच बाद 115 धावा. 

DC vs RCB, Match Live Update : दिल्लीला आणखी एक धक्का, रोवमन पॉवल बाद

DC vs RCB, Match Live Update :   जॉश हेजलवूडने रोवमन पॉवलला बाद करत आरसीबीला चौथं यश मिळवून दिले. पॉवल शून्य धावसंख्येवर बाद झाला

DC vs RCB, Match Live Update : दिल्लीला तिसरा धक्का, मार्श 14 धावांवर बाद

DC vs RCB, Match Live Update :   मिशेल मार्शच्या रुपाने दिल्लीला तिसरा धक्का बसला आहे. मार्श 23 चेंडूत 14 धावा काढून बाद झाला. 

DC vs RCB, Match Live Update : दिल्लीला दुसरा धक्का, डेविड वॉर्नर बाद

DC vs RCB, Match Live Update :  66 धावांवर डेविड वॉर्नरला हसरंगाने बाद करत दिल्ला दुसरा धक्का दिला. दिल्लीला विजयासाठी 51 चेंडूत 91 धावांची गरज

DC vs RCB, Match Live Update : वॉर्नरचं अर्धशतक, दिल्लीची आश्वासक सुरुवात

DC vs RCB, Match Live Update :  पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी केली आहे. वॉर्नरने 32 चेंडूत अर्धशतक झळकावलं. या खेळीदरम्यान वॉर्नरने चार षटकार लगावले. दिल्लीला विजयासाठी 63 चेंडूत 113 धावांची गरज

DC vs RCB : दिल्लीची चांगली सुरुवात, एकही विकेट न गमावता 50 धावा पूर्ण

सलामीलीक वॉर्नर आणि शॉ यांनी दिल्लीसाठी 50 धावा पूर्ण केल्या आहेत.

DC vs RCB : कार्तिकच्या फिनिशिंगने दिल्लीसमोर 190 धावाचं लक्ष्य

अखेरच्या काही षटकात कार्तिकने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे दिल्लीसमोर आता 190 धावांचे लक्ष्य आहे.

DC vs RCB : दिनेशचं धडाकेबाज अर्धशतक

दिनेशने धमाकेदार फलंदाजी करत 26 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार ठोकत 52 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.

DC vs RCB : कार्तिकची दमदार खेळी

दिनेश कार्तिक आज अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत आहे. नुकतीच त्याने मुस्तफिजूर रेहमानला तीन सलग चौकार लगावले आहेत.

DC vs RCB, Match Live Update : आरसीबीचा अर्धा संघ तंबूत, अर्धशतकानंतर मॅक्सवेलही बाद

 DC vs RCB, Match Live Update : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, अनुज रावत, सुयेश प्रभुदेसाई यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. ग्लेन मॅक्सवेलने एकाकी झुंज दिली. मॅक्सवेल अर्धशतकानंतर माघारी परतला. मॅक्सवेलने 34 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान मॅक्सेवलने दोन षटकार आणि सात चौकार लगावले. दिल्लीकडून शार्दूल, खलील, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 

DC Vs RCB: आरसीबीच्या संघानं दुसरी विकेट्स गमावली, फाफ डू प्लेसिस स्वस्तात माघारी परतला

आरसीबीच्या संघानं दुसरी विकेट्स गमावली आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं खलील अहमदच्या गोलंदाजीवर आपली विकेट्स गमावली आहे. त्यानं 11 चेंडूत केवळ 8 धावा केल्या.

DC Vs RCB: आरसीबीला पहिला झटका, अनुज रावत बाद

नाणेफेक गमावल्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. आरसीबीचा सलामीवीर अनुज रावत स्वस्तात माघारी परतला आहे. 


 

DC vs RCB : दिल्ली कॅपिटल्स अंतिम 11

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद.

DC vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अंतिम 11

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज. 

DC vs RCB : नाणेफेक जिंकत दिल्लीने निवडली गोलंदाजी

सामन्यात नुकतीच नाणेफेक झाली असून दिल्लीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

DC vs RCB : बंगळुरु संभाव्य अंतिम 11   

अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, जोस हेझलवुड, सुयश प्रभुदेसाई, आकाश दीप, मोहम्मद सिराज


 

DC vs RCB : दिल्ली संभाव्य अंतिम 11  

ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रेहमान, खलील अहमद


 

DC vs RCB : आज दिल्ली-बंगळुरु आमने-सामने

आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या दिवसाचा दुसरा आणि आयपीएलमधील 27 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (DC vs RCB) या दोन संघात पार पडत आहे.

पार्श्वभूमी

DC vs RCB, Live Score : आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या दिवसाचा दुसरा आणि आयपीएलमधील 27 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (DC vs RCB) या दोन संघात पार पडत आहे. आयपीएलमध्ये आजवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 26 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं जड राहिलं आहे. त्यांनी 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे दिल्ली संघाला 10 सामने जिंकण्यात यश आलं आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. 


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना मुंबईतील प्रसिद्ध अशा वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium, Mumbai) खेळवला जाणार आहे. यंदा या मैदानात झालेल्या पाच पैकी चार सामन्यात चेस करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे आजही नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेऊ शकते. त्यात सामना सायंकाळी असल्याने दवाची अडचण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की. 


दिल्ली संभाव्य अंतिम 11  


ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रेहमान, खलील अहमद


बंगळुरु संभाव्य अंतिम 11   


अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, जोस हेझलवुड, सुयश प्रभुदेसाई, आकाश दीप, मोहम्मद सिराज


महत्त्वाच्या इतर बातम्या :


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.