DC vs SRH : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 50 वा सामना आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) अशी लढत पार पडत आहे. सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली. पण दिल्लीच्या फलंदाजानी याचा पुरेपुर फायदा घेत तुफान फटकेबाजी करत तब्बल 207 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. ज्यामुळे आता हैदराबादला विजयासाठी 208 धावा करायच्या आहेत.


 


सामन्यात प्रथम हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी दिल्ली कमी धावांत रोखण्याची रणनीती आखली होती. पण दिल्लीच्या डेव्हिड वॉर्नरने सलामीला आल्यापासून तुफान फटकेबाजी सुरु ठेवली. नंतर त्याला पोवेलने दिलेल्या दमदार साथीच्या जोरावर दोघांनी मिळून धावसंख्या 200 पार पोहोचवली. सामन्यात सुरुवातीला मनदीप सिंह शून्यावर बाद झाला. भुवनेश्वरने त्याला बाद केलं. त्यानंतर मिचेल मार्शही 10 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मात्र पंतने टिकून राहत वॉर्नरला साथ दिली. पण पंतही 26 धावा करुन बाद झाला. त्यानंतर रोवमेन पोवेल क्रिजवर आला आणि त्याने वॉर्नरसोबत तुफान फटकेबाजी करत संघाची धावसंख्या 207 पर्यंत नेली. यावेळी वॉर्नरने 58 चेंडूत नाबाद 92 धावा ठोकल्या. तर पोवेलने 35 चेंडूत नाबाद 67 धावा ठोकल्या. यावेळी वॉर्नरने तब्बल 12 चौकार आणि 3 षटकार तर पोवेलने 3 चौकार आणि 6 षटकार ठोकले.


उमरान-सीन पडले महाग


हैदराबादच्या गोलंदाजांना आज खास कामगिरी करता आली नाही. भुवनेश्वरने, गोपाल आणि सीन एबॉट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. पण एबॉट आणि उमरान यांना मात्र दिल्लीकरांनी धू धू धुतले. उमरानला 4 षटकात तब्बल 52 तर एबॉचला 4 षटकात 47 धावा दिल्लीच्या फलंदाजांनी ठोकल्या.


हे देखील वाचा-