CSK vs RCB, Match Match Highlight : सलग चार सामने गमावल्यानंतर अखेर चेन्नईनं पहिला विजय नोंदवला
आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यात पार पडत आहे.
नवी मुंबईच्या (Navi Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 22 व्या सामन्यात चेन्नईच्या संघानं बंगळुरूसमोर (Chennai Super Kings Vs Royal Challengers Bangalore) समोर 217 धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात बगंळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं (Faf du Plessis) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात दोन विकेट्स गमावून धावा केल्या. प्रत्युरात मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघाला 20 षटकात विकेट्स गमावून 193 धावापर्यंत मजल मारता आली.
बंगळुरूविरुद्ध नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईनं मजबूज पकड दिसत आहे. बंगळुरूला विजयासाठी 18 चेंडूत 48 धावांची गरज आहे.
चेन्नई विरुद्ध सामन्यात आरसीबीचा संघ डगमगताना दिसला आहे. आरसीबीला विजयासाठी 29 बॉलमध्ये 71 धावांची गरज आहे.
आरसीबीचे 4 गडी स्वस्तात माघारी परतले आहेत. महेश तिक्षणा याने दोन विकेट घेतल्या आहेत. तर मुकेश आणि जाडेजाने एक-एक विकेट घेतली आहे.
चेन्नई सुपरकिंग्सकडून शिवम दुबे आणि रॉबिन उथप्पा यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने 216 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.
हसरंगाने उथप्पा पाठोपाठ जाडेजाला बाद केलं आहे.
एका दमदार खेळीनंतर रॉबिन उथप्पा बाद झाला आहे. त्याने 88 धावा केल्या आहेत.
शिवम दुबेसह रॉबिन उथप्पा यांनी दमदार खेळी करत एक चांगली भागिदारी करत आपआपली अर्धशतकं पूर्ण केली आहेत.
रॉबिन आणि शिवम दुबेने चेन्नईचा डाव सांभाळला असल्याने 100 धावांच्या पार त्यांची धावसंख्यो पोहोचली आहे.
चेन्नईने दुसरी विकेट मोईन अलीच्या रुपात गमावली आहे. तो तीन धावा करुन धावचीत झाला आहे.
चेन्नई संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड तंबूत परतला आहे. जोश हेझलवुडने त्याला पायचीत केलं आहे.
चेन्नईकडून रॉबीन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड मैदानात उतरले आहेत.
रॉयल चँलेजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे.
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एम.एस. धोनी (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, मुकेश चौधरी, अॅडम मिल्ने
अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, डेविड विली, वानिंदू हसरंगा, सिद्धार्थ कौल, आकाश दीप, मोहम्मद सिराज
आयपीएलमध्ये आजवर चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 28 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता चेन्नईचं पारडं जड आहे. कारण चेन्नईने 28 पैकी 18 सामने एकहाती जिंकत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर आरसीबीला 9 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
पार्श्वभूमी
CSK vs RCB, Live Score : आयपीएलमधील (IPL 2022) आजचा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (CSK vs RCB) या दोन दमदार संघात पार पडत आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईला चार पैकी चार सामने गमवावे लागले असल्याने त्यांचा फॉर्म खराब असल्याचे साफ दिसत आहे. दुसरीकडे आरसीबी मात्र कमाल फॉर्ममध्ये असून त्यांनी चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज चेन्नई विजयाचं खातं उघडणार की बंगळुरु त्यांची विजयी मालिका कायम ठेवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना पार पडणाऱ्या नवी मुंबईतील डी.वाय.पाटील मैदानात (DY Patil Stadium) आजही नाणेफेक जिंकणारा सामना नक्कीच गोलंदाजी निवडेल. कारण सामना सायंकाळी असल्याने दवाची अडचण होण्याची दाट शक्यता आहे. त्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यात संघाकडून चांगला स्कोर होताना पाहायाला मिळत आहे. अगदी मोठा नाही तर अगदी कमीही नाही, आव्हानात्मक स्कोर उभा होत असल्याने सामने चुरशीचे होत आहेत. त्यात आजचा सामना असणारे दोन्ही संघ दमदार असल्याने आजचा सामना क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणी असेल.
बंगळुरु संभाव्य अंतिम 11
अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, डेविड विली, वानिंदू हसरंगा, सिद्धार्थ कौल, आकाश दीप, मोहम्मद सिराज
चेन्नई संभाव्य अंतिम 11
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एम.एस. धोनी (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, मुकेश चौधरी, अॅडम मिल्ने
महत्त्वाच्या इतर बातम्या
SRH vs GT : हैदराबादच्या नवाबांचा विजय, गुजरातचा पहिला पराभव
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -