CSK vs MI, Match Live Updates : मुंबईचा चेन्नईवर विजय

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ आमने-सामने असणार असून मुंबईच्या वानखेडे मैदानात हा सामना पार पडणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 May 2022 10:41 PM
CSK vs MI, Match Live Updates : मुंबईचा चेन्नईवर पराभव

डॅनिअल सॅम्सच्या भेदक माऱ्यानंतर तिलक वर्माच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने चेन्नईचा पाच गड्यांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा तिसरा विजय होय.. तर चेन्नईचा आठवा पराभव झालाय. या पराभवासह चेन्नईचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलेय. तिलक वर्माच्या 34 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने चेन्नईवर पाच गड्यांनी विजय मिळवलाय. 

मुंबईला पाचवा धक्का, ह्रतिक शौकिन बाद

मुंबईला पाचवा धक्का बसला आहे. जम बसलेला ह्रतिक शौकिन 18 धावांवर बाद झाला. मुंबईला विजयासाठी 11 धावांची गरज

CSK vs MI : मुकेश चौधरीचा मारा सुरुच, चौथा गडी बाद

मुकेशने ट्रीस्टनला शून्यावर बाद केलं आहे.

CSK vs MI : मुंबईने तीन गडी बाद

मुंबईला आणखी एक झटका बसला आहे. मुकेशने डॅनियल सॅम्सला तंबूत धाडलं आहे.

CSK vs MI : रोहितही तंबूत परत

18 धावा करुन कर्णधार रोहित शर्माही बाद झाला आहे. सिमरजीतने त्याला बाद केला आहे.

CSK vs MI : ईशान किशन स्वस्तात बाद

ईशान किशनने 6 धावा केल्या असून मुकेशने पहिल्याच षटकात त्याला तंबूत धाडलं आहे.

CSK vs MI : ;चेन्नई सर्वबाद, मुंबईसमोर 98 धावांचे आव्हान

अखेरचा गडी मुकेश चौधरी धावचीत झाला असून धोनी 36 धावांवर नाबाद राहिला आहे. आता मुंबईसमोर विजयासाठी 98 धावांचे आव्हान आहे.

CSK vs MI : चेन्नईचा नववा गडीही बाद

चेन्नईचा नववा गडी महेश तिक्षाणाच्या रुपात तंबूत परतला आहे. रमनदीपने त्याला बाद केलं आहे.

CSK vs MI : सीमरजीतही तंबूत परत

कुमार कार्तिकेयने आणखी एक विकेट घेतली असून त्याने सीमरजीतला तंबूत परतवलं आहे.

CSK vs MI : ब्राव्होही बाद

चेन्नईला सातवा झटका बसला असून ड्वेन ब्राव्हो तंबूत परतला आहे. कुमार कार्तिकेयने त्याला बाद केलं आहे.

CSK vs MI, Match Live Updates : मुंबईचा तिखट मारा, चेन्नईची दाणादाण, सहा गडी तंबूत

शिवम दुबेच्या रुपाने चेन्नईला सहावा धक्का बसला आहे. रायली मेरिडेथने दुबेचा अडथळा दूर केला. मुंबई सहा बाद 39 धावा.

CSK vs MI, Match Live Updates : मुंबईचा भेदक मारा, चेन्नईची दाणादाण, अर्धा संघ तंबूत

मुंबई इंडियन्सच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईच्या फंलदाजाचा दाणादाण उडाली आहे. चेन्नईचा अर्धा संघ तंबूत परतलाय. डॅनिअल सॅम्सने तीन तर बुमराह आणि रायली मेरिडेथने एक एक विकेट घेतली आहे. संघाची सर्व मदार आता कर्णधार धोनी आणि शिवम दुबे यांच्यावर आहे. चेन्नई पाच बाद 31 धावा

चेन्नईला मोठा धक्का, ऋतुराज गायकवाड बाद

डॅनिअल सॅम्सने चेन्नईला आणखी एक झटका दिला आहे. सॅम्सने ऋतुराज गायकवाडला 7 धावांवर तंबूत धाडलेय. चेन्नई चार बाद 17 धावा... 

चेन्नईला तिसरा धक्का, रॉबिन उथप्पाही बाद

दोन धक्क्यातून सावरतो ना सावरतो तोच चेन्नईला आणखी एक धक्का बसला आहे. अनुभवी रॉबिन उथप्पाला जसप्रीत बुमराहने तंबूचा रास्ता दाखवलाय. चेन्नई तीन बाद सहा धावा. 

मुंबईला लागोपाठ दोन धक्के, कॉन्वे-मोईन अली बाद

पहिल्याच षटकात चेन्नईला दोन मोठे धक्के बसले आहेत. सलामी फलंदाज डेवेन कॉन्वे आणि मोईन अली यांना डॅनिअल सॅम्सने पहिल्याच षटकात बाद केलेय. 

CSK vs MI : नाणेफेक जिंकत मुंबईने निवडली गोलंदाजी

नुकतीच नाणेफेक पार पडली असून मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली आहे.

CSK vs MI : मुंबई संभाव्य अंतिम 11  

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, रमनदीप सिंह, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, रिले मॅरिडथ, कुमार कार्तिकेय 

CSK vs MI : चेन्नई संभाव्य अंतिम 11

डेवॉन कॉन्वे, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ड्वेन ब्रॉवो, महेश चौधरी, महेश तीक्ष्णा, सीमरजीत सिंह  


 

CSK vs MI : आज चेन्नई-मुंबई आमने सामने

 यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) आज पार पडणाऱ्या 59 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. आजचा हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडणार आहे. 

पार्श्वभूमी

CSK vs MI, Live Score : आयपीएलच्या (IPL 2022) मैदानात आज चेन्नई आणि मुंबई हे दोन संघ मैदानात उतरणार आहे. स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असूनही यंदा गुणतालिकेत सर्वात तळाशी असणाऱ्या या दोन संघातील आजची लढाई जणू अस्तित्त्वाची लढाईच असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने 11 पैकी केवळ 7 सामने पराभूत होत 8 गुणांसह नववं स्थान मिळवलं आहे. तर मुंबई 11 पैकी 9 सामन्यात पराभूत होत दहाव्या स्थानावर आहे. दोघांनी इतके सामने गमावल्याने आज एकमेकांविरुद्ध हे संध कशी कामगिरी करणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल.


आजचा चेन्नई सुपरकिंग्स (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. इतर मैदानांच्या तुलनेत वानखेडेची सीमारेषा काहीशी छोटी असल्याने चौकार-षटकारांची बरसात याठिकाणी होते. त्यामुळे मोठी धावसंख्या उभा राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आजचा सामना सायंकाळी असल्यान दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेऊ शकतो.


चेन्नई संभाव्य अंतिम 11


डेवॉन कॉन्वे, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ड्वेन ब्रॉवो, महेश चौधरी, महेश तीक्ष्णा, सीमरजीत सिंह  


मुंबई संभाव्य अंतिम 11  


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, रमनदीप सिंह, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, रिले मॅरिडथ, कुमार कार्तिकेय 


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.