RR vs CSK : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजच्या 68 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सच्या मोईने अलीने 93 धावा ठोकूनही संघाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. राजस्थान रॉयल्सला विजयासाठी केवळ 151 धावाच करायच्या आहेत. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (RR vs CSK) सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या करण्याची त्यांची रणनीती होती. पण राजस्थानने भेदक गोलंदाजी केल्यामुळे चेन्नईचा संघ 20 षटकात केवळ 150 धावाच करु शकला. त्यामुळे राजस्थानला आता 120 चेंडूत अर्थात 20 षटकात 151 धावा करायच्या आहेत.

Continues below advertisement



सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत चेन्नईने फलंदाजी घेतली. पण सलामीवीर ऋतुराज स्वस्तात बाद झाला. कॉन्वेही 16 धावा करण्यातच यशस्वी झाला. मोईने अलीने सुरुवातीपासून दमदार फलंदाजी सुरु ठेवली. पण त्याला खास कोणाचीच साथ मिळाली नाही. केवळ धोनीने 26 धावांची खेळी केली, इतर फलंदाज दुहेरी आकडेवारीही गाठू शकले नाहीत. त्यामुळे मोईन अलीच्या 93 धावांच्या जोरावर चेन्नई 150 धावाच करु शकली. राजस्थानकडून सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण ओबेद मेकॉयने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 4 षटकात 20 धावा देत 2 विकेट्स नावे केल्या आहेत. तर चहलनेही दोन तर आश्विन आण बोल्टने प्रत्येकी एक विकेट घेतली.


आजचा विजय आणि राजस्थान प्लेऑफमध्ये


आज पार पडणाऱ्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (RR vs CSK) या सामन्यात राजस्थानचा संघ जिंकल्यास ते थेट प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळवतील आणि गुणतालिकेतही झेप घेऊ शकतात. पण सामना गमावला तरी त्यांचा नेटरनरेट चांगला असल्याने ते नक्कीच पुढील फेरीत पोहोचतील. तर चेन्नई सुपरकिंग्सचा यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना असल्याने ते स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी आज सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील.


हे देखील वाचा-