Indian Premier League: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 14 व्या सत्राची तयारी सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल 2021 चा लिलाव 11 फेब्रुवारी रोजी होऊ शकतो. यापूर्वी 21 जानेवारीपर्यंत सर्व संघांना त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल. मुंबई इंडियन्सकडून कोणते खेळाडू रिलीज केले जाऊ शकतात, हे जाणून घेऊया.


गेल्या मोसमात म्हणजेच आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्सने विजेतेपदावर नाव कोरलं. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीए 2020 मधील सर्वात संतुलित आणि मजबूत संघदेखील होता. परंतु असे असूनही, आगामी हंगामाच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स काही खेळाडूंना रिलीज करू शकतो.


कोणत्या खेळाडूंना रिलीज केलं जाऊ शकतं?


ख्रिस लिन


आयपीएल 2020 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लिनला दोन कोटी रुपयांत विकत घेतले. परंतु क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा या ओपनर्समुळे लिनला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सचे टीम मॅनेजमेंट आगामी हंगामासाठी लिनला रिलीज करु शकतात.


लसिथ मलिंगा


श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2020 मध्ये खेळू शकला नाही. वाढत्या वयामुळे आणि संघात आधीपासूनच पुरेसे गोलंदाज असल्यामुळे मुंबई इंडियन्स मलिंगाला रिलीज करू शकते.


शार्फेन रदरफोर्ड


मुंबई इंडियन्सने गेल्या मोसमात ट्रेड विंडोअंतर्गत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू शराफेन रदरफोर्डचा संघात समावेश केला होता. रदरफोर्ड आयपीएल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल संघाचा सदस्य होता. आयपीएल 2020 मध्ये रदरफोर्डला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत मुंबई त्यांना या हंगामापूर्वीच रिलीज करू शकते.