IPL 2021 मुंबई आणि राजस्थान या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात मुंबईच्या संघानं राजस्थानच्या संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. यावेळी मुंबईच्या संघातील खेळाडूंच्या फलंदाजांनी क्रीडारसिकांची मनं जिंकली. त्यातच एक असा प्रसंग घडला, जेव्हा मुंबईचा खेळाडू कायरन पोलार्ड अगदी कोणाला दमदाटी करतात, त्याप्रमाणं सीमारेषेच्या दिशेनं जाणाऱ्या चेंडूला दमदाटी करताना दिसला. 


मुख्य म्हणजे चेंडूही जणू त्याचं ऐकतच आहे, अशाच आवेगात थेट सीमारेषेकडे गेला. हा विनोदी क्षण या सामन्याच्या निमित्तानं चर्चेचा विषय ठरला. मुंबईच्या संघाचा डाव सुरु असताना 18 व्या षटकात क्रिस मॉरिसनं टाककेला बाऊन्सर सोडण्यासाठी पोलार्ड खाली वाकला खरा, पण त्याला काही चेंडू हुकवता आला नाही. चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळला आणि उसळी घेऊन थेट गतीनं सीमारेषेच्या दिशेनं गेला. काही क्षणांसाठी नेमकं काय घडलं हे कोणाच्याही लक्षात आलं नाही, पण जेव्हा चेंडू सीमारेषेकडे जात आहे हे पोलार्डनंही पाहिलं तेव्हा त्यानं चक्क चेंडूलाच दमदाटी करत सीमारेषेपलीकडे जाण्यासाठी तो डोळे लावून बसला. पोलार्डचा हा अंदाज मैदानातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू आणून गेला. 


Prithvi Shaw Records: जबरदस्त... पृथ्वी शॉनं एकाच षटकात ठोकले सहा चौकार, वेगवान अर्धशतकाचाही विक्रम






कसा रंगला मुंबई आणि राजस्थानमधील सामना? 


दिल्लीमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबईने राजस्थानवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. राजस्थाननं मुंबईसमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मुंबईनं 9 चेंडू राखून तीन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईकडून क्विंटन डि कॉकनं शानदार 70 धावांची खेळी केली. 172 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉकनं संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र रोहित 17 चेंडूत 17 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादवही मोठी खेळी करु शकला नाही. 


सूर्यकुमारनं 10 चेंडूत 16 धावा केल्या. मात्र क्विंटननं एक बाजू जबरदस्त खेळी तर 50 चेंडूत नाबाद 70 धावांची खेळी केली. कृणाल पांड्यानेही त्याला चांगली साथ दिली. त्याने 26  चेंडूत 39 धावांची खेळी केली. क्रुणाल बाद झाल्यानंतर क्विंटननं पोलार्डसोबत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 


मुंबईनं आता 6 सामन्यांपैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळाला असून 3 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा संघ सहा गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. राजस्थानचा संघानेही 6 पैकी 2 सामन्यांत विजय मिळाला असून चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.