PBKS vs KKR : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनमधील आजचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएल 2021चा 21वा सामना पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये खेळवण्यात येणार आहे. पंजाब किंग्सने आपल्या गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 9 विकेट्सनी पराभव केला होता. तर कोलकाता नाइट रायडर्सचा आपल्या गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सहा विकेट्सनी परभाव केला होता. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी आज मैदानात उतरतील. 


कोलकाता नाईट रायडर्सची सर्वात मोठी चिंता ठरतेय ती म्हणजे, मिडल ऑर्डर. आतापर्यंतच्या सामन्यात कोलकाताची मिडल ऑर्डर फारशी चांगली खेळी करु शकली नाही. त्याचसोबत सलामीची जोडीही आतापर्यंत संघाला चांगली सुरुवात करुन देऊ न शकल्यामुळं संघासाठी अडचण निर्माण झाली आहे. कोलकाताचा कर्णधार इयोन मोर्गनही धावा करण्याच अयशस्वी ठरला. त्यानं पाच सामन्यांत आतापर्यंत केवळ 45 धावा केल्या आहेत. 


पण पंजाबचा संघानं मुंबई इंडियन्सचा पराभव करत पुन्हा एकदा आपला विजयी चक्र सुरु केलं आहे. आतापर्यंत संघाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. परंतु, फलंदाज मात्र फारशी चांगली खेळी करु शकलेले नाहीत. दरम्यान, गेल्या सामन्यात कर्णधार केएल राहुलने तरुण लेग स्पिनर रवि बिश्नोईला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केलं होतं. बिश्नोईनं चार ओव्हर्समध्ये केवळ 21 धावा देत दोन विकेट्स घेतले. दरम्यान, संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, मयंक अग्रवाल आणि क्रिस गेल आपल्या फॉर्मात परतले आहेत. त्याचसोबत कर्णधार केएल राहुल या टुर्नामेंटमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 


दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. तसं पाहायला गेलं तर, जरी फलंदाजीमध्ये पंजाबचं पारडं जड असलं तरी कोलकाताच्या गोलंदाजांसमोर निभाव लागण मात्र कठिण आहे. 


पंजाबचा संभाव्य संघ : केएल राहुल (कर्णधाव आणि विकेटकीपर), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, मोइजेज हेनरिक्स, शाहरुख खान, क्रिस जॉर्डन, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.


कोलकाताचा संभाव्य संघ : शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयोन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, पेंट कमिंस, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी आणि प्रसिद्ध कृष्णा.


महत्त्वाच्या इतर बातम्या : .


Video | विजय शंकरची 'गगनभेदी' गोलंदाजी पाहून ब्रेट लीसुद्धा हैराण