IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे. दोन्ही संघांकडे सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये पहिलं स्थान मिळवण्याची संधी आहे. दोन्ही संघांनी 4 सामन्यांनंतर 6 पॉइंट्स मिळवले आहेत. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची धुरा सांभाळणारा विराट कोहली या सामन्यात आपली धमाकेदार खेळी करणार का? याकडे सर्वांचं लक्षं असणार आहे.
विराट कोहलीने राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या मागील सामन्यात आपली दमदार खेळी केली होती. विराटने नाबाद अर्धशतक ठोकलं होतं. तसेच हा सामना बंगलोरच्या संघाने जिंकलाही होता. याआधीच्या तीन सामन्यांमध्ये विराट कोहलीने फत्त 18 धावा केल्या होत्या.
परंतु, आजच्या सामन्यात विराटसमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे, लेग स्पिनर बॉलर्सचं. विराट कोहलीला 2017 पासून आतापर्यंत गेल्या 4 वर्षांत लेग स्पिन गोलंदाजांनी 6 वेळा आऊट केलं आहे. आयपीएल 2020 मध्ये विराट कोहली राहुल चहरच्या चेंडूवर बाद झाला आहे. लेग स्पिनर्सच्या विरूद्ध फक्त आयपीएलमध्येच नाहीतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही विराच संघर्ष करत आहे.
विराट कोहलीची ही पडती बाजू पाहता दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अमित मिश्रा आयपीएल 2020 मध्ये सध्या चांगला फॉर्मात आहे. आज अमित मिश्रा विराट कोहली विरोधात कोणतं चक्रव्ह्यूह आखणार? आणि अमितने आखलेलं हे चक्रव्ह्यूह विराट भेदणार का? आजच्या सामन्यात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये रविवारी झालेल्या डबल हेडरनंतर पॉइंट टेबलची स्थिती पूर्णपणे बदलली आहे. सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात मिळालेल्या विजयामुळे मुंबई इंडियन्सला फायदा झाला आहे. तर धोनीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या चेन्नईच्या संघाने पंजाबवर मात करत विजय मिळवल्यामुळे पॉइंट टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर कूच केली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने चारपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला असून संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या संघाचा नेट रन रेट +0.59 आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा नेट रन रेट -0.95 सह 6 पॉइंट्स घेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
IPL 2020 : सीएसकेच्या विजयामुळे बदलली Points Table ची समीकरणं; केएल. राहुलला फायदा, तर शमीला नुकसान