IPL 2020 : आयपीएल 2020 मधील आपला पहिल्या सामन्याआधीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टीव स्मिथ, ऑलराउडंर बेन स्टोक्स आणि विकेटकिपर जोस बटलर चेन्नई सुपर किंग्सच्या विरोधातील पहिला सामना खेळू शकणार नाही. संघातील दिग्गज खेळाडू पहिल्या सामन्यात खेळू शकणार नसल्यामुळे विरूद्ध संघाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
शारजाहमध्ये 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राजस्थान आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना रंगणार आहे. इंग्लंडचा स्टार खेळाजू जोस बटलरने रविवारी खुलासा केला की, तो यूएईमध्ये क्वॉरंटाईन असल्यामुळे पहिला सामना खेळू शकणार नाही.
राजस्थान रॉयल्सने सोशल नेटवर्किंग साइट इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये बटलर असून तो म्हणाला की, 'मी क्वॉरंटाईन असल्यामुळे दुर्दैवाने राजस्थान रॉयल्ससाठी पहिला सामना खेळू शकणार नाही. मी इथे माझ्या कुटुंबासोबत आहे. ही चांगली गोष्ट आहे की, राजस्थान रॉयल्स संघाच्या वतीने मला माझ्या कुटुंबाला येथे घेऊन येण्याची परवानगी दिली. माझ्यासाठी ही खूप मोठी मदत आहे.'
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव स्मिथला इंग्लंडच्या दौऱ्यावर मॅनचेस्टरमध्ये नेट प्रॅक्टिस करताना दुखापत झाली होती. त्यामुळे स्मिथ चीन वनडे मॅचमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. तसेच याच कारणामुळे स्मिथ आयपीएलमध्ये होणाऱ्या राजस्थानच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
वडिलांसोबत आहे बेन स्टोक्स
स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्सही चेन्नई सुपर किंग्सच्या विरूद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. स्टोक्सच्या वडिलांना ब्रेन कॅन्सरचं निदान झालं आहे. त्यामुळे बेन स्टोक्स आपल्या कुटुंबासोबत क्राइस्टचर्चमध्ये आहे. स्टोक्स ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे आणि टी-20 सामन्यांमध्येही सहभागी झाला नव्हता.
संजू सॅमसनला मिळू शकते कर्णधारपदाची धुरा
विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसनकडे कर्णधार पदाची धुरा जाऊ शकते. संजू एक अनुभवी आयपीएल खेळाडू आहे. तसेच विदेशी खेळाडूंमध्ये राजस्थान रॉयल्सकडे जोफ्रा ऑर्चर, एंड्रयू टाइ, टॉम करन, अल्फांसो थॉमस आणि डेविड मिलर आहेत.
आयपीएल 2020मध्ये राजस्थान रॉयल्स आपला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सच्या विरोधात खेळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्स अबुधाबीमध्ये आयपीएल 2020 च्या सलामीच्या सामन्या स्टार संघ मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव करत विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
IPL 2020, SRH vs RCB Preview : आज मैदानात भिडणार सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
आयपीएलमध्ये आतापर्यंत कधी-कधी झाल्या सुपरओव्हर, काय सांगतो इतिहास? जाणून घ्या
IPL 2020 DC vs KXIP | मयंक अगरवालची धडाकेबाज खेळी अपयशी, पंजाबचा दिल्लीकडून सुपर ओव्हरमध्ये पराभव