IPL 2020 : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही आयपीएलमध्ये दमदार खेळी करताना तो दिसत आहे. विकेटकिपिंग करताना महेंद्र सिंह धोनी एकापेक्षा एक कॅच पकडताना दिसत आहे. केकेआर विरूद्धच्या सामन्यात धोनीने आपला हा सिलसिला सुरुच ठेवल्याचं दिसून आलं. शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या उजव्या बाजूला कमालीची डाइव्ह मारत धोनीने कॅच पकडला. धोनीने पकडलेल्या याच कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केकेआर विरुद्धच्या सामन्यात ब्रावोने फुल लेंथच्या ऑफ स्टंपपासून बाहेरच्या बाजूला चेंडू टाकला. या चेंडूंवर शिवम मावीच्या बॅटची कडा लागली आणि चेंडू विकेटच्या मागल्या बाजूला गेला. धोनी अशाप्रकारच्या कॅचसाठी आधीपासूनच उजव्या हातातील ग्लव्स काढून तयार होता. जसा चेंडू आला तसं धोनीने उडी मारत तो अडवला आणि त्यानंतर डाइव्ह मारत कॅच पकडला.
पाहा व्हिडीओ :
धोनीच्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा कॅच पकडताना धोनीने फक्त आपली तप्तरताच दाखवली नाही तर सर्वांना दाखवून दिलं की, निदान सध्या तरी त्याच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाहीत.
धोनीने या कॅचसोबत आयपीएलमध्ये एक इतिहासही रचला आहे. धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक कॅच पकडणारा विकेटकीपर बनला आहे. धोनीने केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकचा 103 कॅचचा रेकॉर्ड मोडीत काढत, हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. दरम्यान, धोनी आणि कार्तिक दोघेच असे विकेटकिपर आहेत, ज्यांनी विकेट किपिंग करताना आयपीएलमध्ये 100 हून अधिक कॅच पकडले आहेत.
दरम्यान, धोनी फलंदाजीत संघाला विजय मिळवून देण्यात अयशस्वी ठरला. केकेआरने या सामन्यात जिंकण्यासाठी चेन्नईसमोर 168 धावांचं आव्हान ठेवलं होतं. केकेआरच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या सीएसकेने मात्र 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 157 धावा केल्या. शेवटी संघाला 10 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा चेन्नईचा यंदाच्या आयपीएलधील सहा सामन्यांपैकी चौथा पराभव आहे.
महत्त्वाच्या बातम्या :