नवी दिल्ली :  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी 6 जूनपासून सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे सहायक प्रशिक्षक रेयान टेन डेशट यांनी रिषभ पंत संदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. रिषभ पंतकडून उपकर्णधारपद काढून पुन्हा केएल राहुल याच्याकडे देण्यात आलं आहे. यामुळं रिषभ पंत नाराज झालाय की नाही याबाबत सहायक प्रशिक्षकांनी वक्तव्य केलं आहे.

Continues below advertisement

सहायक प्रशिक्षक रेयान टेन डेशट यांनी यांनी पंतच्या फलंदाजीवर भाष्य केलं. ते पंतनं परिस्थितीनुसार खेळलं पाहिजे. फलंदाजांनं कोणत्याही अधिकृत पदाशिवाय जबाबदारी घेऊन खेळलं पाहिजे. संघासाठी नेता बनण्यासाठी  कोणत्याही पदाची आवश्यकता नसते. आम्हाला वाटतं की पंतनं मॅचमधील स्थितीनुसार खेळावं आणि योग्य निर्णय घ्यावेत. 

उपकर्णधार पद गेल्यानं रिषभ पंत नाराज?

बीसीसीआयनं गेल्या महिन्यात अफगाणिस्ता विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या संघात रिषभ पंतला स्थान दिलं आहे. मात्र, उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. उपकर्णधारपद काढल्यासंदर्भात सहायक प्रशिक्षक रेयान टेन डशेट म्हणाले की पंतनं कर्णधार पदावरुन काढल्यानं तक्रार केलेली नाही. आतापर्यंत पंतचं कसोटी करिअर शानदार आहे. मात्र, पंतला कधी कधी जोखीम असलेले किंवा बेजबाबदार फटके मारुन बाद झाल्यानं टीकेचा सामना करावा लागला आहे.  

Continues below advertisement

रिषभ पंतचं कसोटी करिअर

आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रिषभ पंतनं 49 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 86 डावात फलंदाजी करताना  42.91 च्या सरासरीनं 3476  धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं 8 शतक आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. रिषभ पंतनं नाबाद 159 धावा ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध भारताचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, रिषभ पंत, देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मानव सुथार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.