RCB vs SRH, Match highlights : हैदराबादचा मोठा विजय, 9 विकेट्सनी बंगळुरुला दिली मात

आज दुसरा सामना बंगळुरु विरुद्ध हैदराबाद असा असणार असून मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात हा सामना पार पडला.

abp majha web team Last Updated: 23 Apr 2022 10:01 PM
RCB vs SRH : हैदराबादचा मोठा विजय

हैदराबादने एक विकेट गमावत 68 धावाचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. त्यामुळे नऊ विकेट्सनी सामना हैदराबादने जिंकला आहे.

RCB vs SRH : हैदराबादची चांगली सुरुवात

69 धावांचे लक्ष्य गाठताना हैदराबादने चांगली सुरुवात केली आहे. त्यांनी 4 षटकात एकही विकेट न गमावता 33 धावा केल्या आहेत.

RCB vs SRH : आरसीबी 68 धावांवर सर्वबाद

आरसीबीचा संघ आज अतिशय खराब फॉर्ममध्ये दिसून आला ते अवघ्या 68 धावाच आज करु शकले आहेत.

RCB vs SRH : आरसीबी 68 धावांवर सर्वबाद

आरसीबीचा संघ आज अतिशय खराब फॉर्ममध्ये दिसून आला ते अवघ्या 68 धावाच आज करु शकले आहेत.

RCB vs SRH : हर्षल पटेलही बाद

आरसीबीला आठवा झटका बसला असून हर्षल पटेल बाद झाला आहे.

RCB vs SRH, Match Live Updates :बंगळुरुला सातवा झटका

शाहबाज अहमद 7 धावा करुन बाद झाला आहे.

RCB vs SRH, Match Live Updates : आरसीबीला मोठा धक्का, दिनेश कार्तिक शून्यावर बाद

 RCB vs SRH, Match Live Updates :


दिनेश कार्तिकच्या रुपाने आरसीबीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कार्तिक शून्य धावसंख्येवर बाद झाला. आरसीबीला सहावा धक्का बसला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कार्तिकची बॅट तळपली होती. पण हैदराबादविरोधात कार्तिकला एकही धाव काढता आली नाही. 

RCB vs SRH, Match Live Updates : आरसीबीला पाचवा धक्का, प्रभुदेसाई बाद

 RCB vs SRH, Match Live Updates : आरसीबीची फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. 47 धावांत आरसीबीचा निम्मा संघ तंबूत गेलाय. प्रभुदेसाई 15 धावा काढून बाद झालाय. 

RCB vs SRH, Match Live Updates : हैदराबादचा भेदक मारा, मॅक्सवेलही बाद

RCB vs SRH, Match Live Updates : हैदराबादच्या गोलंदाजीपुढे आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. विराट कोहली, फॅफ डु प्लेसिसनंतर मॅक्सवेलही बाद झाला. त्यामुळे आरसीबी चार बाद 20 धावा... मॅक्सवेलनं 12 धावा काढल्या. 

हैदराबादच्या गोलंदाजांचा भेदक मारा, 10 धावांच्या आत आरसीबीचे 3 फलंदाज आऊट

हैदराबादच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बंगळुरूच्या संघानं गुडघे टेकले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या 10 धावांच्या आत तीन महत्वाचे विकेट्स गमावले आहेत.

आजी- माजी कर्णधार बाद, बंगळुरूला दोन झटके, विराट कोहली पुन्हा गोल्डन डकचा शिकार

हैदराबादविरुद्ध सामन्यात बंगळुरूची खराब सुरुवात झाली. हैदराबादच्या गोलंदाजांनी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली स्वस्तात माघारी धाडलं आहे. 

RCB Vs SRH:  बंगळुरू आणि हैदराबादच्या सामन्याला सुरुवात

बंगळुरू आणि हैदराबादच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादच्या संघानं बंगळुरूला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. 


 

सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेट किपर), शशांक सिंह, जगदीशा सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक, टी नटराजन. 


 

RCB Vs SRH: आरसीबी प्लेईंग इलेव्हन

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज. 

RCB Vs SRH: हैदराबादच्या संघाचा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यात हैदराबादच्या संघानं नाणेफेक जिंकून संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीच्या संघानं सात पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, या हंगामातील सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर हैदराबादच्या संघानं जोरदार कमबॅक करत सलग चार सामने जिंकले आहेत. आजचा सामना दोन्ही  संघासाठी महत्वाचा आहे. यामुळं आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


 

पार्श्वभूमी

RCB vs SRH, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजच्या दिवसातील दुसरा साना ऱॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद (RCB vs SRH) या दोन संघात पार पडत आहे. यंदाच्या हंगामात (IPL 2022) बंगळुरु संघाने 7 पैकी 5 सामने जिंकत तिसंर स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे हैदराबाद मात्र 6 सामने खेळून 4 सामने जिंकल्याने पाचव्या स्थानावर आहे.  


आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार होता. बंगळुरुने यंदा अप्रतिम कामगिरी करत तिसरं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघ देखील चांगली कामगिरी करत असल्याने त्यांच आव्हान बंगळुरुसाठी अडचणीचं ठरु शकतं. आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. आयपीएलमध्ये आजवर रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ तब्बल 20 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता हैदराबादचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरुने 8 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. पण यंदा बंगळुरुचा फॉर्म अधिक चांगला आहे. त्यामुळे दोघांती आजचा सामना चुरशीचा होऊ शकतो हे नक्की. 


बंगळुरु संभाव्य अंतिम 11  


अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, आकाश दीप, मोहम्मद सिराज


हैदराबाद संभाव्य अंतिम 11


अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, जे सुचित, मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी. नटराजन 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.