CSK vs LSG : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या आजच्या सामन्यात बंगळुरु आणि सीएसकेचा संघ एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार असून दोन्ही संघाना पहिला विजय मिळवायचा आहे. दोघांना पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने आता स्पर्धेतील पहिला-वहिला विजय मिळवण्यासाठी दोघेही सज्ज झाले असून काही खास खेळाडूंकडून सर्वांनाच अपेक्षा असणार आहे.


1. ऋतुराज गायकवाड : या खेळाडूंमधील सर्वात पहिलं नाव म्हणजे चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड. मागील हंगाम गाजवलेल्या ऋतुराजने यंदा मात्र पहिल्या सामन्यात खास कामगिरी केली नाही. तो शून्य धावांवर बाद झाला आहे. त्यामुळे आजतरी तो दमदार कामगिरी करेल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.


2. मोईन अली : चेन्नईचा आणखी एक खेळाडू ज्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल को म्हणजे अष्टपैलू मोईन अली. उशीरा भारतात दाखल झाल्याने पहिल्या सामन्यात मोईन खेळू शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तरी तो खेळेल का? असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.


3. केएल राहुल : लखनौचा कर्णधार केएल पहिल्या सामन्यात खातंही खोलू शकला नाही. पण एक अव्वल दर्जाचा क्रिकेटर असल्य़ाने आज तो दम दाखवेल अशी आशा सर्वांना आहे.


4. दीपक हुडा : अष्टपैलू दीपकने गुजरातविरुद्ध सामन्यात उत्तम कामगिरी केली. त्यामुळे आजच्या सामन्यातही त्याच्याक़डून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. त्यामुळे तो आज काय कामगिरी करेल हे पाहावे लागेल. 


5. आयुष बडोनी : पहिल्या सामन्यात लखनौकडून 22 वर्षीय आयुष बडोनी याने पदार्पणाच्या सामन्यात तुफानी खेळी केली. दबावात संघ असतानाही आयुषने 41 चेंडूत 54 धावांचे योगदान दिले. त्यामुळे त्याच्यावर आज साऱ्यांच्या नजरा असतील.


चेन्नईची संभाव्य अंतिम 11  


ऋतुराज गायकवाड, रॉबीन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, अॅडम मिल्ने, तुषार देशपांडे


लखनौची संभाव्य अंतिम 11 


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनिष पांडे, एविन लुईस, कृणाल पंड्या, दीपक हुडा, आयुष बडोनी, आवेश खान, मोहसीन खान, रवी बिश्नोई, दुश्मिंता चमिरा 


हे देखील वाचा-