CSK vs SRH : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (CSK vs SRH) या दोघांमध्ये रंगणाऱ्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नईचे खेळाडू प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. स्पर्धेतील आजचा हा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानात खेळवला जाणार असून दुपारच्या वेळेत होणार असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेईल अशी आशा होती. पण हैदराबादने प्रथम गोलंदाजी निवडत समोरच्या संघाला कमी धावांत रोखून टार्गेट चेस करण्याची रणनीती आखली आहे.
चेन्नईने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 3 पैकी 3 सामने गमावले असून हैदराबादने देखील 2 पैकी 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे दोन्ही संघाना आज पहिल्या विजयाची प्रतिक्षा असणार आहे. चेन्नईने महेश तीक्षणाला तर हैदराबादने शशांक सिंग आणि मार्को जेन्सन या खेळाडूंना आज सामन्यात संधी दिली आहे, तर नेमकी अंतिम 11 खेळाडू कोण आहेत ते पाहूया...
चेन्नई अंतिम 11
रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, डी. ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महिश तीक्षणा, मुकेश चौधरी
हैदराबाद अंतिम 11
अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार) निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्करम, वॉशिंग्टन सुंदर, शशांक सिंग, मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी नटराजन
हे देखील वाचा-
- CSK vs SRH : चेन्नई विरुद्ध हैदराबाद, दोघांना पहिल्या विजयाची प्रतिक्षा, कशी असेल अंतिम 11, कुठे पाहाल सामना?
- IPL 2022: राहुल तेवतियानं सामना फिरवला, गुजरातचा 6 विकेट्सनं विजय; लियाम लिव्हिंगस्टोन आक्रमक खेळी व्यर्थ
- Shikhar Dhawan: टी-20 क्रिकेटमध्ये शिखर धवननं रचला इतिहास; विराट, रोहितलाही जमलं नाही ते त्यानं करून दाखवलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha