ICC Test Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (ICC) बुधवारी कसोटी क्रिकेट क्रमावारीका जाहीर केली आहे. दरम्यान, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरल्यानं कसोटी क्रमवारीतील अव्वल दहा खेळाडूंच्या रँकीगमध्ये कोणताही बदल झाला नाही. या यादीत ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज मार्नस लाबुशेन अव्वल स्थानी कायम आहे. तर, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली क्रमश: आठव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. गोलंदाजाच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिंस 901 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर, त्याचे दुसऱ्या स्थानावर असलेल्या रविचंद्रन अश्विनपेक्षा 51 गुण अधिक आहेत. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताचा रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहे. पूर्वीच्या आणि सध्याच्या क्रमवारीत फक्त श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सीरीजचा सामना खेळण्यात आला. त्यामुळे या दोन देशांतील खेळाडूंनीच गुण मिळवले. पहिल्या कसोटीत बांगलादेशच्या एकमेव डावात 88 धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास तीन स्थानांनी आघाडी मिळाली आहे. तो आता 17 व्या स्थानावर आहे. या सामन्यात सामनावीर ठरलेल्या मॅथ्यूजनं पहिल्या डावात 199 धावा केल्यानं त्याला पाच स्थानांचा फायदा झाला असून तो 21व्या स्थानावर पोहचला आहे.
साप्ताहिक आयसीसी कसोटी रँकिंग अपडेटमध्ये बांगलादेशच्या मुशफिकुर रहीम आणि पहिल्या कसोटीत शतके झळकावणाऱ्या तमिम इक्बाल यांनाही फायदा झाला. 105 धावांच्या जोरावर मुशफिकुरनं चार स्थानांनी प्रगती करत 25व्या स्थानावर झेप घेतली आहे. तमिमला सहा स्थानांचा फायदा झाला असून तो 27 व्या स्थानावर पोहचला आहे. तमिमनं 133 धावांची खेळी खेळली. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन गोलंदाजांच्या क्रमवारीत एका स्थानाची आघाडी मिळाली आहे. सध्या तो 29व्या स्थानावर पोहोचला आहे. शाकिबनं पहिल्या कसोटीत चार विकेट घेतल्या.
हे देखील वाचा-