Mumbai Indians : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा चषक उंचावणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). त्यांनी तब्बल पाच वेळा विजय मिळवला आहे. पण यंदा याच मुंबईने सहा पैकी सहा सामने गमावत दहावं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्यांचे चाहते अतिशय निराश आहेत. अशात आता त्यांच्या ट्रेनिंग सेशनदरम्यान अचानकपणे मधमाशांनी हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. यात कोणत्याही खेळाडूला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली नसली, तरी मधमाशा भर मैदानात आल्यामुळे खेळाडूंना मैदानातच लोटांगण घालावं लागलं. दरम्यान या सर्वाचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मुंबईचा प्रवास खडतर

मुंबई इंडियन्से (MI) यंदा सलग सहा सामने गमावल्यामुळे ते शून्य गुण आणि  -1.048 च्या रनरेटसह ते सर्वात शेवटच्या अर्थात दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे सध्यातरी त्यांना स्पर्धेत राहण्यासाठी उर्वरीत आठ सामन्यांपैकी सात सामने जिंकणं अनिवार्य आहे. हे सर्व सामने चांगल्या रनरेटने जिंकणंही तितकच महत्त्वाचं आहे. पण यंदा आयपीएलमध्ये आठ जागी 10 संघ असल्याने मुंबईला पुढील फेरीत स्थानासाठी उर्वरीत आठ पैकी आठ सामने चांगल्या रनरेटने जिंकण अनिवार्य आहे. कारण पुढील फेरीत एन्ट्रीसाठी 16 गुण गरजेचे असल्याने मुंबई आठ पैकी आठ सामने जिंकल्यासत 16 गुण मिळवू शकते. दरम्यान मुंबईला पुढील फेरीत जाण्यासाठी इतर संघाचा खेळही तितकाच महत्त्वाचा असणार आहे.

मुंबई संघाचे उर्वरीत सामने

गुरुवार, 21 एप्रिलडी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबईचेन्नई सुपरकिंग्ससायंकाळी 7.30 वाजता
रविवार, 24 एप्रिलवानखेडे स्टेडियम, मुंबईलखनौ सुपरजायंट्ससायंकाळी 7.30 वाजता
शनिवार, 30 एप्रिलडी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबईराजस्थान रॉयल्ससायंकाळी 7.30 वाजता
शुक्रवार, 6 मेब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईगुजरात टायटन्ससायंकाळी 7.30 वाजता
सोमवार, 9 मेडी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबईकोलकाता नाईट रायडर्ससायंकाळी 7.30 वाजता
गुरुवार, 12 मेवानखेडे स्टेडियम, मुंबईचेन्नई सुपरकिंग्ससायंकाळी 7.30 वाजता
मंगळवार, 17 मेवानखेडे स्टेडियम, मुंबईसनरायजर्स हैदराबादसायंकाळी 7.30 वाजता
शनिवार, 21 मेवानखेडे स्टेडियम, मुंबईदिल्ली कॅपिटल्ससायंकाळी 7.30 वाजता

हे देखील वाचा-