Mumbai Indians Hardik Pandya and Tilak Varma Rohit Sharma : मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) सध्या सगळं काही ठीक नसल्याचं दिसत आहे. प्लेऑफमधून बाहेर जाण्याच्या मार्गावर असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या अडचणी कमी व्हायच्या नाव घेईनात. कर्णधार हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्यामध्ये जोरदार वाद झाल्याचं समोर आले आहे. दिल्लीविरोधातील सामन्यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये ड्रेसिंग रुममध्ये कडाक्याचा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद मिटवण्यासाठी रोहित शर्माला मध्यस्थी करावी लागली. त्याशिवाय संघ मालकानेही हस्तक्षेप करत हा वाद मिटवल्याचं समोर आलेय. ट्वीटरवर याबाबतचा दावा करण्यात आला आहे. 


व्हायरल होणाऱ्या ट्वीटमध्ये काय दावा केलाय ?


दिल्लीविरोधातील सामन्यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. हार्दिक पांड्याच्या स्वभावावर तिलक वर्मानं हस्तक्षेप करत प्रश्नचिन्ह उपस्थित केला. दिल्लीविरोधातील सामन्यानंतर हार्दिक पांड्यानं तिलक वर्माला पराभवास जबाबदार धरलं होतं. पम मुळात मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा तिलक वर्माच्याच नावावर होत्या. तिलक वर्मानं 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. तरीही हार्दिक पांड्याने तिलक वर्मा याच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे तिलक वर्माला राग अनावर झाला होता. सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. वादाची तिव्रता वाढल्यानंतर माजी कर्णधार रोहित शर्मान मध्यस्थी करत वाद मिटवला. 



रोहित शर्मा याची मध्यस्थी 


हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्यात वाद झाल्याचं एक्स खात्यावर सांगणाऱ्या युजर्सला रोहित शर्मा फॉलो करत असल्याचं दिसतेय. दरम्यान, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्यातील वाद रोहित शर्मानं मिटलवला. त्याशिवाय संघाच्या मालकालाही हस्तक्षेप करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार क्लार्क यानेही मुंबईच्या ताफ्यात दोन गट पडल्याचा दावा केला होता. मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात शानदार कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्माचं कर्णधारपद काढल्यामुळे अनेक खेळाडूंमध्ये नाराजी आहेच, त्याशिवाय चाहत्यांमध्येही रोष आहे. 


मुंबईची वाट कठीण -


मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांचा पाच वेळचा चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) हटवून आयपीएलच्या चालू हंगामात हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढल्यामुळे काही खेळाडू निराश आहेत. मुंबई इंडियन्सला क्वालिफाय करण्यासाठी उर्वरित सर्व सामन्यात विजय अनिवार्य झालाय.  मुंबई इंडियन्सला दहा सामन्यामध्ये फक्त तीन विजय मिळवता आले आहेत. सात सामन्यात पराभवाचा सामना कराव्या लागणाऱ्या मुंबई इंडियन्सवर प्लेऑफमधून बाहेर जाण्याचं संकट ओढावलं आहे. उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवला तरीही मुंबईला इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे.