Hardik Pandya vs Rohit Sharma : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium in Ahmedabad) गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सचा (GT vs MI) सहा धावांनी पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी हराकिरी केली. अखेरच्या तीन षटकांमध्ये मुंबईने (Mumbai Indians) सामना गमावला. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबईचं नेतृत्व करताना पराभवाचा धक्का बसलाय. पण या सामन्यावेळी रोहित शर्माचे चाहते आणि हार्दिक पांड्याच्या चाहत्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांनी हार्दिक पांड्याच्या चाहत्याला फटकावलेय. स्टेडियममध्ये हा राडा झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काही चाहत्यांच्या मते, मुंबई आणि गुजरातच्या चाहत्यांमध्ये राडा झाला. तर काहींच्या मते, रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली. नक्की प्रकार काय होता, हे समोर आलेले नाही.


हार्दिक पांड्याने मुंबईचा कर्णधार म्हणून गुजरातच्या मैदानावर खेळत होता. हार्दिक पांड्या मूळचा गुजरातचा आहे. मागील दोन हंगामात हार्दिक पांड्या गुजरात संघाचा कर्णधार होता. त्यानं गुजरातला दोन्ही हंगामात फायनलपर्यंत नेलं होतं. पण 2024 आधी तो मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला. याआधीही तो मुंबईचाच सदस्य होता. पण हार्दिक पांड्या मुंबईत परतल्याचं रोहित शर्माच्या चाहत्यांना रूचलं नाही. कारण, मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हाकलपट्टी केले, मुंबईचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवलं. त्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर तू तू मी मी सुरु होतं. आता सामन्यादरम्यानही हा वाद उफाळून आला. त्याआधी सामन्यावेळीही रोहित शर्माच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल केले. 


पाहा व्हायरल व्हिडीओ - 














 नरेंद्र मोदी स्टेडियमवर हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यातील चाहत्यांचा वाद उफाळून आला. मुंबई आणि गुजरातच्या सामन्यादरम्यान दोन चाहत्यांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.