Yash Dayal, GT vs SRH : रिंकू सिंह याने यश दयाल याला लागोपाठ पाच षटकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला होता. या सामन्यानंतर यश दयाल याचे मानसिक आरोग्य बिघडले होते.. वजनही घटले.. या काळात गुजरातच्या संघाने त्याला या काळात चांगली साथ दिली.. तब्बल 35 दिवस स्वत:शी लढा दिला.. त्यानंतर आज यश दयाल याने जबरदस्त कमबॅक केले. पहिल्याच षटकात त्याने विकेट घेतली.
यश दयाल याने हैदराबादचा सलामी फलंदाज यश दयाल याला तंबूत धाडले. यश दयाल याने जबरदस्त कमबॅक केले. यश दयाल याच्या कमबॅकचे सोशल मीडियावर स्वागत करण्यात आले.
Who is Yash Dayal : कोण आहेत यश दयाल?
यश दयाल हा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा रहिवासी आहे. यशचे वडील चंद्रपाल हे देखील त्यांच्या काळातील चांगले वेगवान गोलंदाज होते. एवढेच नाही तर या गोलंदाजाची आयपीएल 2022 मधील शानदार कामगिरीनंतर बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघात यश दयालची निवड झाली. पण यशला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
Yash Dayal in IPL 2022 : गेल्या हंगामात चांगली कामगिरी
यश दयाल हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याचा आयपीएलमधील हा दुसरा हंगाम आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मेगा लिलावात त्याला गुजरात टायटन्सने 3.2 कोटी रुपयांना विकत घेतलं. यशने पदार्पणाच्या मोसमात 9 सामन्यात 11 विकेट घेतल्या. गेल्या मोसमात त्याने चांगली गोलंदाजी केली. यशसाठी आयपीएल पदार्पण दमदार ठरलं. त्यानं राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 4 षटकात 40 धावा देत तीन बळी घेतले होते. यशने शानदार खेळी करत अवघ्या 9 सामन्यांत 11 बळी घेत गेल्या मोसमात गुजरातला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.