GT vs MI, IPL 2023 Live : गुजरातचा मुंबईवर 55 धावांनी विजय

GT vs MI Live Score: गुणतालिकेत चौथ्या क्रमांकाचा संघ गुजरात आणि सातव्या क्रमांकाचा संघ मुंबई इंडियन्स यांच्यात आज सामना रंगणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 25 Apr 2023 11:21 PM

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 35, GT vs MI: आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. 16...More

फिरकीच्या जाळ्यात अडकला मुंबईचा संघ - 

 


गुजरातच्या फिरकी गोलंदाजाच्या जाळ्यात मुंबईचा संघ अडकला. राशिद खान आणि नूर अहमद या दोघांनी मुंबईचा अर्धा संघ तंबूत पाठवला. राशिद खान याने चार षटकात 27 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. तर नूर अहमद याने चार षटकात 37 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. मोहम्मद शमीने चार षटकात फक्त 18 धावा दिल्या. हार्दिक पांड्याने दोन षटकात 10 धावा देत एक विकेट घेतली. जोश लिटिल याने दोन षटकात 18 धावा खर्च केल्या. मोहित शर्मा याने मुंबईच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले.