MI Vs GT: इंडियन प्रीमियर लीग 2024 सुरू झाल्यामुळे या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. चाहत्यांना एकापेक्षा एक रोमांचक सामने बघायला मिळत आहेत. मात्र, या सामन्यांसोबतच वादांची मालिकाही सुरू झाली आहे. 

Continues below advertisement


आयपीएलचा पहिला वाद मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. हा वाद मुंबईचा फलंदाज तिलक वर्मांबाबत आहे, ज्यांनी महत्त्वाच्या क्षणी राशिद खानच्या चेंडूवर धाव घेण्यास नकार दिला. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी तिलक वर्माच्या या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने तिलक वर्माच्या या निर्णयावर पाठिंबा दिला आहे.


तिलक वर्माचा वाद काय?


मुंबई इंडियन्स लक्ष्याचा पाठलाग करत असताना 17 व्या षटकात रशीद खान गोलंदाजीसाठी आला. टीम डेव्हिडला पहिल्या दोन चेंडूंवर एक धाव काढता आली. यानंतर तिलक वर्माने मिड-विकेटवर तिसऱ्या चेंडूवर शॉट खेळला आणि त्याने एकही धाव घेतली नाही. त्याने स्ट्राइक बदलण्यास नकार दिला. त्याच्या या रणनीतीचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. सुनील गावस्कर यांनी ही रणनीती अत्यंत वाईट असल्याचे म्हटले आहे. रशीदच्या षटकात फक्त 2 धावा झाल्या. अखेरच्या क्षणी मुंबईचा 2 धावांनी पराभव झाला.


तिलक वर्मा यांनी असे का केले?


रशीद खानच्या चेंडूवर टिम डेव्हिडला स्ट्राईक देण्यास तिलक वर्मा यांनी नकार का दिला, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र टीम डेव्हिडचा रशीद खानविरुद्ध खूप वाईट रेकॉर्ड आहे. टीम डेव्हिडला राशिदविरुद्ध 8 चेंडूत 9 धावा करता आल्या असून त्याने दोनदा विकेट गमावली आहे. टिम डेव्हिडला वाचवण्यासाठी तिलक वर्माने त्याला स्ट्राइक दिली नाही. पण तिलकच्या या रणनीतीचाही उपयोग झाला नाही. पुढच्याच षटकात मोहित शर्माने डेव्हिडला 11 धावांवर बाद केले. स्वतः तिलक वर्मा 19व्या षटकात स्पेन्सर जॉन्सनचा बळी ठरला आणि गुजरातने हा सामना जिंकला.


गुजरातने जिंकला सामना 


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने 6 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक हारल्यानंतर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 168/6 धावा केल्या. साई सुदर्शनने संघासाठी 45 (39 चेंडू) सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात 3 चौकार आणि 1 षटकार होता. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाला 20 षटकात 162/9 धावाच करता आल्या.