MS Dhoni Captaincy : आयपीएलच्या 15व्या हंगामाला सुरु होण्यासाठी जवळपास 48 तास शिल्लक असताना भारतीय इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असणाऱ्या एम एस धोनीने चेन्नईचं कर्णधारपदही सोडलं आहे. याआधीच 15 ऑगस्ट, 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता धोनी कर्णधार म्हणून मैदानावर दिसणार नाही. त्याच्या या मोठ्या निर्णयानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत असून भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही एक इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.


या पोस्टमध्ये धोनी आणि कोहली दोघे दिसत आहेत. आयपीएल सामन्यांदरम्यानच्या या फोटोत दोघेही एकमेकांना मिठी मारत असून विराटने याला एक खास कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं आहे की, दिग्गज कर्णधारपदाचा कार्यकाळ अखेर संपला असून हे पर्व चाहते कधीच विसरणार नाहीत. मनापासून आदर.  







 


धोनी आणि आयपीएल


आयपीएलमध्ये 2008 पासून 2021 पर्यंत एम. एस. धोनीने आपल्या संघासाठी अनेक कठीण निर्णय घेतले आहे. धोनीच्या निर्णयाचा संघाला फायदाच झालेला दिसला आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने चार वेळा आयपीएल चषकावर नाव कोरलं आहे. धोनीमुळेच चेन्नई आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी संघ आहे.  धोनीने चेन्नईशिवाय आयपीएलमध्ये पुणे संघाचे नेतृत्वही केले आहे. धोनीने 204 आयपीएल सामन्यात नेतृत्व केले आहे. यापैकी 121 सामन्यात संघाला विजय मिळाला आहे. 82 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. धोनीच्या नेतृत्वात संघाची विजयाची टक्केवारी 59.60 टक्के इतकी आहे. आणखी एक खास बाब म्हणजे, धोनीच्या नेतृत्वात संघ 8 वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचलाय. तर तब्बल 11 वेळा प्लेऑफपर्यंत मजल मारली आहे.


हे ही वाचा-


TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात 'या' पाच खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक धावा, यादीत चार भारतीय फलंदाज


IPL 2022 : विराट कोहली पुन्हा येणार, आरसीबीचं कर्णधारपद कोहली सांभाळेल, आश्विनचा दावा

LSG signs Andrew Tye: लखनौच्या संघाला दिलासा, मार्क वूडने माघार घेतल्यानंतर धाकड ऑस्ट्रेलियन खेळाडूची संघात एन्ट्री


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha