RCB Fan Girl Poster: चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात आज नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर आयपीएलचा 22वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात आरसीबीच्या एका महिला चाहत्यानं झळकावलेला पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  जो पर्यंत आरसीबीचा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकत नाही, तो पर्यंत लग्न करणार नाही, असं या महिलेनं पोस्टरमध्ये लिहलं आहे. भरमैदानात महिलेनं झळकलेल्या या पोस्टरमुळं सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे.


सध्या चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात आयपीएलचा 22 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात चार विकेट्स गमावून बंगळुरूसमोर 217 धावांचं लक्ष्य ठेवलंय. या सामन्यात चेन्नईचा फलंदाज रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबेनं आक्रमक खेळी केली. रॉबिन उथप्पानं 88 तर, शिवम दुबेनं 94 धावा केल्या. चेन्नईच्या कामगिरीसह सोशल मीडियावर आणखी एका वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या सामन्यात आरसीबीच्या एका महिला चाहतीनं झळकावलेल्या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. जो पर्यंत आरसीबीचा संघ आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरत नाही, तो पर्यंत लग्न करणार नाही, असं त्या महिलेनं पोस्टरमध्ये लिहलंय.



आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला. सध्या आयपीएलचा पंधरावा हंगाम खेळला जात आहे. यापैकी मुंबईच्या संघानं सर्वाधिक पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यानंतर चेन्नईच्या संघानं चार वेळा आयपीएलचा खिताब जिंकला आहे. त्यानंतर कोलकाता आणि हैदराबादच्या संघानं प्रत्येकी दोन वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. तर, आयपीएलची ट्रॉफी जिंकणारा राजस्थान पहिला संघ ठरला होता. याव्यतिरिक्त कोणत्याही संघाला आयपीएलच्या ट्रॉफी जिंकता आली नाही. दरम्यान, मागील चौदा हंगामापासून बंगळुरूचा संघाला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. यंदाच्या हंगामात फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात बंगळुरूचा संघ आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. 


हे देखील वाचा-