CSK vs RCB: आयपीएल पंधराव्या हंगामातील 22 व्या सामन्यात चेन्नईचा संघ आरसीबीशी (Chennai Super Kings Vs Royal Challengers Bangalore) भिडणार आहे. नवी मुंबईच्या (Navi Mumbai) डीवाय पाटील  स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy)  संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईचा माजी खेळाडू आणि आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं (Faf du Plessis) चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्र सिंह (MS Dhoni) धोनीबाबात  मोठं वक्तव्य केलं आहे. फाफ डू प्लेसिसच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 


फाफ डू प्लेसिस काय म्हणाला?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना फाफ डू प्लेसिस म्हणाला की, "चेन्नईच्या संघाकडून खेळताना मला खूप छान वाटलं. तसेच मला चेन्नईच्या चाहत्यांकडून अतुलनीय प्रेम आणि आदर मिळाला. या लोकांना भेटण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. आज चेन्नईविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या सामन्यात मी आरसीबीला विजय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल. मी 10 वर्षांहून अधिक काळ चेन्नईच्या संघासाठी खेळलो आहे. यासाठी मी त्यांचं खूप आभार मानतो. माझ्या मनात त्यांच्याविषयी एक विशेष स्थान आहे. महेंद्रसिंह धोनीकडून मला खूप काही शिकायला मिळालं. तो सर्वोकृष्ट कर्णधार आहे. मी भारताच्या दोन महान कर्णधारांसोबत वेळ घातलाय. ज्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या." 


चेन्नईविरुद्ध विराट कोहली रचणार इतिहास
आयपीएल पंधराव्या हंगामातील 22 व्या सामन्यात चेन्नईचा संघ आरसीबीशी भिडणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील  स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नव्या विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे. या विक्रमापासून विराट कोहली फक्त 52 धावा दूर आहे. 


संघ- 


चेन्नईचा संघ- 
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एम.एस. धोनी  (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, मुकेश चौधरी, महेश तिक्षणा .


बंगळुरूचा संघ-
अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, जोस हेझलवुड, सुयश प्रभुदेसाई, आकाश दीप, मोहम्मद सिराज.


हे देखील वाचा-