कोरोना संसर्गाचा वाढता धोका पाहता आयपीएल (IPL) 2021 चा पहिला टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे. अशा स्थितीत प्रश्न उद्भवत होता की परदेशी खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्या संघांचे प्रतिनिधित्व करतील की नाही? याच संदर्भात क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून बातम्या येत आहेत की इंग्लंड संघाचे खेळाडू आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होताना दिसतील. आयपीएलमध्ये इंग्लंडमधील अनेक क्रिकेटपटू जे वेगवेगळ्या फ्रँचायझींच्या संघांमध्ये सहभागी होतात. अशा परिस्थितीत इंग्लंडमधून येणारी ही बातमी नक्कीच आशादायी आहे.


आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, त्याचवेळी इंग्लंड संघाला बांगलादेशविरुद्ध मालिका खेळण्यासाठी दौरा करावा लागेल. पण आता बातमी येत आहे की इंग्लंड संघ बांगलादेशचा दौरा स्थिगित करु शकतो. बांगलादेश दौरा पुढे ढकलल्यास इंग्लिश खेळाडू यूएईला जाऊन आयपीएलमध्ये खेळू शकतात. आयपीएलनंतर लगेचच टी-20 विश्वचषक देखील यूएईमध्येच सुरू होणार आहे, त्यामुळे जर इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी झाले तर वर्ल्डकपपूर्वी त्यांच्यासाठी हा एक चांगला सराव असेल.


सध्या इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील मालिका पुढे ढकलल्याची पुष्टी झालेली नाही. पण जर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हा दौरा पुढे ढकलला, तर ते निश्चितपणे आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी यूएईला पाठवतील. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग आयपीएलमध्ये पाकिस्तान वगळता देशातील सर्व मोठे खेळाडू खेळताना दिसतात. यावर्षीही सर्व देशांचे क्रिकेट स्टार आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.


PL 21 पुन्हा 19 सप्टेंबरपासून सुरु होणार
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2021 चं 14 वं सत्र पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आयपीएल 2021 च्या बायो बबलमध्ये कोरोनाने प्रवेश केल्यामुळे आयपीएल मधेच थांबवली गेली होती. पण आता आयपीएल लीग पुन्हा एकदा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.


पहिला सामना मुंबई आणि चेन्नईत
आयपीएल 2021 च्या दुसर्‍या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. 14 व्या मोसमातील उर्वरित 31 सामने दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे खेळवले जाणारा आहेत, असं सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला दुबईमध्ये खेळला जाईल.