Michael Vaughan On Pak Journalist : आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज महाअंतिम सामना होत आहे. प्लेऑफ सामन्याआधी इंग्लंडच्या बोर्डाने खेळाडूंना मायदेशी बोलवले होते. पाकिस्तानविरोधातील टी20 मालिकेसाठी इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएल सोडून मायदेशी परतावे लागलेय. आयपीएलनंतर लगेच टी20 वर्ल्डकप होणार आहे, त्यामुळे इंग्लंड बोर्डाने खेळाडूंना मायदेशी बोलवले होते. पण आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानं हा चुकीचा निर्णय असल्याचं सांगितले. मायकल वॉन यानं पाकिस्तान-इंग्लंड यांच्यातील मालिकेपेक्षा आयपीएल सरस असल्याचं सांगितलं. यावरुन पाकिस्तानच्या एका पत्रकाराने मायकल वॉन याला माफी मागावी, असे सांगितले. पण मायकल वॉन यानं त्या पत्रकाराची सोशल मीडियावर इज्जत काढली.
मायकल वॉन म्हणाला की, फिलिप सॉल्ट, जोस बलटर आणि विल जॅक्स यासारख्या खेळाडूंना आयपीएल नॉकआऊट सामन्याद्वारे टी20 विश्वचषकाची चांगली तयारी करण्याची संधी होती. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी20 मालिका या खेळाडूंसाठी तेवढी फायदेशी ठरली नाही. आयपीएल प्लेऑफमध्ये जास्त प्रेशर होता, ज्यामुळे विश्वचषकासाठी चांगली तयारी करता आली असती.
मायकल वॉनच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानी पत्रकार फरीद खान याला राग आला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत मायकल वॉन याला सुनावले, अन् माफी मागण्याची मागमी केली. फरीद खान म्हणाला की, मायकल वॉन याने आयपीएलवर आपलं वक्तव्य करत पाकिस्तानी गोलंदाजांचा अपमान केला आहे. जर आम्ही वर्ल्डकप जिंकलो, तर पाकिस्तानच्या चाहत्यांची माफी मागणार का ? तुम्हाला आयपीएल कॉन्ट्र्रक्ट हवे की आणखी काही ?
एका शब्दात मायकल वॉनचे सडेतोड उत्तर -
फरीद खान याच्या ट्वीटनंतर मायकल वॉन यानं एका शब्दात त्याला सडेतोड उत्तर दिले. मायकल वॉन यानं त्याला फक्त नाही... असे स्पष्ट शब्दात सांगितले. म्हणजेच, मायकल वॉन कोणत्याही स्थितीमध्ये पाकिस्तानी चाहत्यांची माफी मागणार नाही.
पाकिस्तानचा दारुण पराभव, इंग्लंडचा मोठा विजय -
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चार सामन्याची टी 20 मालिका सुरु झाली. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पण दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विराट विजयाची नोंद केली. जोस बटलर यानं वादळी अर्धशतक ठोकले. पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव झाला. बाबार आझम फ्लॉप ठरला.