चेन्नई : कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यात आयपीएलच्या 17 व्या हंगामातील अंतिम फेरीची (IPL Final) लढत रंगणार आहे. आयपीएलमध्ये दोन्ही तुल्यबळ संघ  चेन्नईच्या एमए. चिदंबरम स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. आयपीएलच्या फायनलकडे चेन्नईतील प्रेक्षकांसह देशभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील फायनल मॅचवर  पावसाचं सावट आहे. कोलकाताचा संघ काल सरावासाठी मैदानावर उतरला होता. मात्र, पावसामुळं चेन्नईला सराव सत्र रद्द करावं लागलं. आज पावसामुळं मॅच होऊ शकली नाही तर उद्या राखीव दिवशी मॅच खेळवली जाईल. पावसामुळं आयपीएलची फायनल खेळवण्याचे सर्व पर्याय संपले तर केकेआरला विजेतेपद दिलं जाऊ शकतं. मात्र, त्यासाठी कोणती परिस्थिती निर्माण व्हावी लागेल हे जाणून घेऊया. 


... तर केकेआरला एकही बॉल न खेळता विजेतेपद 


कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स चेपॉकवर आमने सामने येतील. चेन्नईत आज पावसानं हजेरी लावली आणि मॅच सुरुच होऊ शकली नाही तर उद्याच्या राखीव दिवसाचा विचार केला जाऊ शकतो. राखीव दिवशी देखील पाऊस झाल्यास पाच पाच ओव्हरची मॅच खेळवली जाऊ शकते. जर तेही शक्य नसेल तर एक सुपर ओव्हर खेळवली जाईल. सुपर ओव्हर देखील खेळवणं शक्य झालं नाही तर केकेआरला एकही बॉल न खेळता विजेतेपद दिलं जाऊ शकतं. 


केकेआरला विजेतेपद कसं मिळणार? 


पाऊस आणि अन्य कारणांमुळं आयपीएल फायनल होऊ शकत नसेल तर विजेता तर ठरवावाच लागणार आहे. त्यामुळं आयपीएल मॅनेजमेंट लीग स्टेजमध्ये गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या केकेआरला विजेतेपद देऊ शकतात. केकेआरनं त्यांच्या लीग स्टेजमधील 14 मॅचमध्ये 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळं त्यांच्याकडे 18 आणि दोन मॅचेस रदद् झाल्यानं त्यांचे प्रत्येकी एक एक गुण असे 20 गुण आहेत. तर, दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादकडे 17 गुण आहेत. त्यामुळं पावसामुळं मॅच होऊच शकत नाही, अशी स्थिती झाल्यास केकेआरला विजेतेपद दिलं जाऊ शकतं. 


दरम्यान, भारतातील आणि विदेशातील क्रिकेट चाहत्यांची इच्छा मात्र फायनलमध्ये पावसानं व्यत्यय आणू नये अशीच असेल. सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व पॅट कमिन्स करतोय. तर, केकेआरचं नेतृत्त्व मराठमोळा श्रेयस अय्यर करतोय. त्यामुळं आजच्या मॅचमध्ये पावसानं व्यत्यय आणू नये अशीच इच्छा भारतातील करोडो क्रिकेट रसिकांची असेल. आज सायंकाळी होणाऱ्या आयपीएल फायनलकडे कोट्यवधी प्रेक्षकांची इच्छा पावसानं व्यत्यय आणू नये, अशीच आहे. 


संबंधित बातम्या : 


IPL Final :केकेआरच्या यशाचं श्रेय गंभीरला मिळतंय, तुला नाही... श्रेयस अय्यरच्या उत्तरानं मनं जिंकली


IPL 2024 Final KKR vs SRH: चेपॉकमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी कोलकाता सज्ज; गौतम गंभीरच्या नेतृत्वात केला होता करिष्मा