Dinesh Karthik : आयपीएलमध्ये पंचांची सुमार कामगिरी सुरुच आहे. एलिमेनटर सामन्यात तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णायामुळे पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. याआधाही पंचांनी आयपीएलमध्ये चुकीचे निर्णय देत वाद ओढावून घेतला होता. आवेश खान याच्या षटकामध्ये दिनेश कार्तिकला मैदानावरील पंचाने बाद दिले. दिनेश कार्तिक याने तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. पंचांनी एक ते दोन वेळा फुटेज पाहून नाबाद असल्याचं सांगितले. तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचाला आपला निर्णय मागे घेण्यास सांगितले. दिनेश कार्तिक याला मोक्याच्या क्षणी जीवदान मिळाले. दिनेश कार्तिक याला जीवनदान मिळाल्याचा फायदा आरसीबीला झाला, पण फटका राजस्थानला बसला. कार्तिकने फिनिशिंग टच देत आरसीबीची धावसंख्या वाढवली. दिनेश कार्तिक याला बाद असताना दिलं नाही, त्यामुळे समालोचकांनीही नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावरही याची चर्चा सुरु झाली आहे.
दिनेश कार्तिक याला तिसऱ्या पंचांनी नाबाद दिल्यानंतर राजस्थानच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. आवेश खान याने इ
शाऱ्याने बॅट आणि चेंडूचा संपर्कच झाला नसल्याचं वक्तव्य केले. तर कोच कुमार संगाकाराही भडकले. ते सामन्यावेळीच तिसऱ्या पंचाला भेटण्यासाठी गेल्याचं समोर आले.
इरफान पठाणची नाराजी -
तिसरे पंच अनिल चौधरी यांच्या निर्णायावर इरफान पठाण आणि रवि शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली. इरफान पठाण म्हणाला की, "दिनेश कार्तिकची बॅट पॅडला लागली होती. पण तिसऱ्या पंचांनी चुकीचा निर्णय घेतला. राजस्थानचा संघ सामन्यात आणखी वरचढ झाला होता, पण पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे आरसीबीला आणखी एक संधी मिळाली. " समालोचक रवि शास्त्री यांनीही या निर्णायावर नाराजी व्यक्त केली. रवि शास्त्री म्हणाले की, तिसऱ्या पंचांनी चार वेळा व्हिडीओ तपासायला हवा होता. गडबडीत निर्णय दिला.
चेंडू बॅटला लागला की नाही, हे दिनेश कार्तिक यालाही माहिती नव्हते. दिनेश कार्तिक याने महिपाल लोमरोर याच्याशी चर्चा केल्यानंतर तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. दिनेश कार्तिक बाद होताच, असा दावा इरफान पठाण याने केलाय.
गावस्कर यांनीही व्यक्त केली नाराजी -
तिसऱ्या पंचाच्या निर्णायावर सुनील गावस्कर यांनीही नाराजी व्यक्त केली. गावस्कर म्हणाले की, पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा ठरला. कार्तिकची बॅट पॅडला लागली. बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क झाला नाही.