MS Dhoni Scoop Shot vs LSG : लखनौविरोधात एमएस धोनीनं (MS Dhoni) 9 चेंडूमध्ये नाबाद 28 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार लगावले. एमएस धोनीने (Dhoni) लगावलेले दोन्ही षटकार खास ठरले. कारण, धोनीनं लगावलेला एक षटकार तब्बल 101 मीटर इतका दूर गेला. तर दुसरा षटकार विकेटच्या मागे शानदार लगवला. धोनीनं क्रिकेट करियरमध्ये आसा शॉट कधीच मारला नसेल. धोनीच्या या शॉट्सचं सोशल मीडियावर कौतुक होतेय.
एमएस धोनी 17व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर फलंदाजीला आला होता. त्या चेंडूवर धोनीने एक धाव घेत आपले खाते उघडले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पुढच्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला, पण कारकिर्दीत पहिल्यांदाच त्यानं असा शॉट खेळला. धोनीनं मारलेला शॉट पाहून स्टेडियममध्ये बसलेल्या प्रत्येकाने आनंदाने उड्या मारल्या.
विकेटच्या मागे धोनीचा शानदार षटकार -
मोहसीन खानच्या दुसऱ्या चेंडूवर धोनीने खणखणीत चौकार मारला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर धोनीने विकेटच्या मागे षटकार ठोकला. मोहसीनच्या या शॉर्ट लेन्थ बॉलवर धोनीने ऑफ साईडला जाऊन विकेटकीपर केएल राहुलच्या डोक्यावर षटकार मारला. धोनीने त्याच्या संपूर्ण क्रिकेट करियरमध्ये क्वचितच असा शॉट खेळला असेल. हा शॉट पाहून स्टेडियममध्ये बसलेल्यांनी एकच जल्लोष केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
यंदाच्या हंगामात धोनीची कामगिरी कशी राहिली ?
एमएस धोनीनं शानदार फिनिशिंग केली. धोनीनं अखेरच्या दोन षटकामध्येच फलंदाजी केली. 42 वर्षीय धोनी यंदाच्या हंगामात पाच वेळा फलंदाजीला आला, अन् पाचही वेळा नाबाद राहिला. धोनीने पाच सामन्यामध्ये 256 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. धोनीने फक्त 34 चेंडूमध्ये 87 धावांचा पाऊस पाडला आहे. धोनीने यंदाच्या हंगामात आठ षटकार आणि सात चौकार ठोकले आहेत. धोनीनं आरसीबीविरोधात 16 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी करत यंदाच्या आयपीएलमधील आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर मुंबईविरोधात 4 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याला चार चेंडूमध्ये ठोकलेल्या 20 धावाच निर्णायक ठरल्या होत्या. आज लखनौविरोधात धोनीने 9 चेंडूमध्ये 28 धावांची वादळी खेळी केली.
अखेरच्या षटकात धोनीच मास्टर -
20 व्या षटकात सर्वाधिक षटकार माऱणाऱ्या फलंदाजांमध्ये धोनी अव्वल स्थानावर आहे. धोनीनं 20 व्या षटकांमध्ये आतापर्यंत 65 षटकार ठोकले आहेत. अखेरच्या षटकात षटकार माऱण्यारे इतर फलंदाज धोनीच्या आसपासही नाहीत.