DC vs LSG Score Live Updates: ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सनं आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवत शेवट गोड केला आहे. दिल्लीनं लखनौचा 19 धावांनी पराभव केला. दिल्लीविरोधातील पराभवानंतर लखनौचं प्लेऑफचं आव्हान खडकर झालेय. लखनौच्या पराभवाचा फायदा राजस्थानला झालाय. राजस्थानचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. प्लेऑफसाठी पात्र होणारा राजस्थानचा दुसरा संघ ठरलाय. याआधी कोलकाता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. दिल्लीनं लखनौचा 19 धावांनी पराभव करत यंदाच्या हंगामाचा शेवट गोड केलाय. लखनौकडून अर्शद खान यानं अखेरपर्यंत झुंज दिली, पण त्याला विजय मिळवून देण्यात अपयश आलं. 


दिल्लीने दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात अतिशय खराब झाली. लखनौने आघाडीचे चार फलंदाज पॉवरप्लेमध्येच गमावले होते. कर्णधार केएल राहुल 5, क्विंटन डि कॉक 12, मार्कस स्टॉय़निस 5 आणि दीपक हुड्डा 0 धावा काढून बाद झाले. लखनौला 4.1 षटकात 44 धावांमध्ये चार धक्के बसले होते. या धक्क्यातून सावरताच आले नाही. केएल राहुल याला मोक्याच्या क्षणी मोठी खेळी करता आली नाही. तर क्विंटन डिकॉकही लवकर तंबूत परतला. 


आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर निकोलस पूरन यांनं झुंज दिली. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. युवा आयुष बडोनी याला फक्त सहा धावा काढता आल्या. बडोनी इम्पॅक्ट पाडण्यात अयशस्वी ठरला. कृणाल पांड्यानं पूरनला साथ दिली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. पांड्याने 18 चेंडूत 18 धावा केल्या. निकोलस पूरन यानं झंझावती फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. 


एका बाजूला विकेट पडत असताना पूरन यानं झंझावती फलंदाजी केली. त्यानं 27 चेंडूमध्ये 61 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत त्यानं चार षटकार आणि सहा चौकारांचा पाऊस पाडला. पूरन यानं 226 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. पूरन याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. पूरन बाद झाल्यानंतर सामना दिल्ली सहज जिंकणार असेच वाटत होते. पण अर्शद खान यानं झुंज दिली. 


आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतल्यानंतरही अर्शद खान यानं एकट्याने झुंज दिली. त्यानं तळाला शानदार अर्धशतक ठोकलं. अर्शद खान यानं 33 चेंडूमध्ये नाबाद 58 धावांची खेळी केली.  या खेळीमध्ये त्याने पाच षटकार आणि तीन चौकार ठोकले. युद्धवीर सिंह यानं 14, रवि बिश्नोई दोन आणि नवीन उल हक यानं दोन धावांची खेळी केली. 


दिल्लीकडून इशांत शर्मा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 34 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं.  खलील अहमद, अक्षर पटेल, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि स्ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.