WPL 2023 Live Update : मुंबईचा सात विकेटने विजय, दिल्लीचा पराभव

DC-W vs MI-W Final LIVE : मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 26 Mar 2023 10:54 PM
मुंबईचा सात विकेटने विजय, दिल्लीचा पराभव

ब्रंटच्या विस्फोटक खेळीच्या बळावर मुंबईने सात विकेटने विजय मिळवला आहे. 

मुंबईचा सात विकेटने विजय, दिल्लीचा पराभव

ब्रंटच्या विस्फोटक खेळीच्या बळावर मुंबईने सात विकेटने विजय मिळवला आहे. 

विजय मुंबईच्या दृष्टीक्षेपात

ब्रंटच्या विस्फोटक खेळीमुळे सामना मुंबईकडे झुकला आहे.

मुंबईला मोठा धक्का, कर्णधार हरमनप्रीत बाद

मोक्याच्या क्षणी हरमनप्रीत कौरने विकेट फेकली. मुंबई तीन बाद 95 धावा

हरमनप्रीत - ब्रंटची विस्फोटक फलंदाजी

सुरुवातीला दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने डाव सावरला. मुंबई इंडियन्सचा स्कोर दोन बाद 75 धावा झाल्या आहेत. 

मुंबईचे अर्धशतक

9.4 षटकात मुंबईने 50 धावांचा टप्पा पार केला आहे. 

मुंबईला दोन धक्के, सलामीची जोडी तंबूत

 


132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. यात्सिका भाटिया आणि हेली मॅथ्युज बाद झाल्या आहेत. मॅथ्यूज 13 तर यात्सिका 4 धावा काढून बाद झाली.

मुंबईला 132 धावांचे आव्हान

शिखा पांडे आणि राधा यादव यांनी अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडल्यामुळे दिल्ली संघाने 131 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईला विजयासाठी 132 धावांचे आव्हान मिळाले आहे

दिल्ली शंभरीपार

शिखा पांडेच्या फटकेबाजीमुळे दिल्लीने 100 धावांचा पल्ला पार केला आहे. 

मुंबईच्या गोलंदाजांना भेदक मारा

इस्सी वोंग आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर ए केर हिने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. 

दिल्लीला नववा धक्का

89 धावांत दिल्लीचे नऊ फलंदाज तंबूत परतले आहेत.

कर्णधार मेग लेनिंग 35 धावा काढून बाद 

फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लेनिंग हिने 35 धावांचे योगदान दिले.   

दिल्लीची फलंदाजी ढासळली, 75 धावांत सात जण तंबूत

दिल्लीची फलंदाजी ढासळली, 75 धावांत सात जण तंबूत

WPL 2023 : वोंगची कमाल, तीन विकेट्स घातल्या खिशात

मागील मॅचमध्ये हॅट्रीक घेतलेल्या वोंग हिने तीन विकेट्स आजही घेत मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली आहे.

MI vs DC Final Live: दिल्लीची प्लेइंग 11

मेग लॅनिंग (कर्णधार), शैफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, मारिजान काप, एलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तान्या भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे, मिन्नू मणि

DC W vs MI W Live : मुंबईची प्लेइंग 11 

 


 यास्टिका भाटिया (विकेटकीपर), हीली मॅथ्यूज, नट साइवर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काजी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक

मुंबई आणि दिल्लीची प्लेईंग 11 कशी आहे? कुणाला मिळाली संधी ?

दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

दिल्लीच्या महिला संघाला पुरुष संघाच्या शुभेच्छा

पुरुष मुंबई इंडियन्सच्या महिला संघाला फायनलसाठी शुभेच्छा

नाणेफेकीचा कौल कोण जिंकणार?

थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार

साखळी सामन्यांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी ?

स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये दोन्ही संघांकडून उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. मुंबईने महिला प्रीमियर लीगची सुरुवात सलग पाच विजयांसह केली. त्याचवेळी दिल्लीने पहिले दोन सामने जिंकले होते. दोन्ही संघांना 8 लीग सामन्यांपैकी 6-6 असे जिंकण्यात यश आले. चांगल्या नेट रनरेटमुळे, दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि संघाने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला, तर मुंबईला यूपी वॉरियर्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागला.

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक

दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य प्लेईंग इलेव्हन

मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, अॅलिस कॅप्स, जेमिमा रॉड्रिग्ज, मारिजाने कॅप, तानिया भाटिया (विकेटकीपर), जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, पूनम यादव.

पार्श्वभूमी

DC-W vs MI-W Final WPL 2023 LIVE: महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेचा यंदाचा हा पहिलाच हंगाम असून आज स्पर्धेचा विजेता कोण हे स्पष्ट होणार आहे. आज (26 मार्च) अखेरचा म्हणजेच फायनलचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) असा खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 


महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाचा विचार केल्यास दोघांनी अखेपर्यंत टेबल टेबल टॉपर राहण्याची कमाल केली. दोघांनी देखील प्रत्येकी 8-8 सामने खेळले असून दोघांनी देखील 6-6 सामने जिंकले असून 2-2 सामने गमावले आहेत. आधी दिल्लीचा संघ फायनलमध्ये पोहोचला ज्यानंतर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरच्या सामन्यात युपी वॉरियर्सला मात देत फायनल गाठली आहे. दोघांनी यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केल्याने एक रंगतदार सामना आज पाहायला मिळू शकतो..


भारतीय कर्णधारासमोर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे आव्हान 


IPL 2008 मध्ये महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जची कमान सांभाळत होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. सध्या हरमनप्रीत कौर भारतीय महिला संघाची कर्णधार आहे आणि मेन लेनिंग महिला ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार आहे. अशा स्थितीत अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरसमोर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे आव्हान आहे. आतापर्यंत WPL मध्ये हरमनप्रीत कौर आणि मेन लेनिंग यांच्याकडून उत्कृष्ट कर्णधारपद पाहायला मिळाले आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीतील 8 पैकी 6-6 सामने जिंकले. पण चांगल्या नेट रनरेटमुळे, दिल्ली कॅपिटल्स पहिल्या क्रमांकावर राहिली आणि संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सला यूपी वॉरियर्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागला. एलिमिनेटर सामन्यात मुंबईने 72 धावांनी दणदणीत विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता जेतेपदाचा सामना कोण जिंकणार हे पाहावे लागेल. दोन्ही संघांमध्ये स्पर्धा आहे, अशा स्थितीत विजेतेपदाचा सामना खूपच रंजक असेल. 


सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?


मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या फायनलच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.