Abhishek Sharma Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad IPL 2022 : गुरुवारी आयपीएलमध्ये (IPL 2022)  दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (DC vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार असणार आहेत. आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. यंदाच्या हंगामातील हा 50 वा सामना असेल. आतापर्यंत झालेल्या नऊ सामन्यात पाच विजय अन् चार पराभवासह हैदराबादने दहा गुणांचा कमाई केली आहे. तर दिल्लीचा संघ नऊ सामन्यात आठ गुण मिळवलेल.. या सामन्यात हैदराबादच्या अभिषेक शर्माला मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे... 


दिल्लीविरोधात हैदराबादचा सलामी फलंदाज लखनौच्या केएल राहुल आणि पंजाबच्या शिखर धवनचा विक्रम मोडू शकतो. युवा अभिषेक शर्माने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा चोपणाऱ्या फलंदाजात अभिषेक शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. अभिषेक शर्माने नऊ सामन्यात 324 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. अभिषेक शर्माला यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये शिखर धवन आणि राहुलचा विक्रम मोडण्याची संधी आहे. शिखर धवनने दहा सामन्यात 369 तर राहुलने 10 सामन्यात 451 धावांचा पाऊस पाडला आहे. 


 आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा चोपण्याचा विक्रम सध्या जोस बटलरच्या नावावर आहे. बटलरने दहा सामन्यात 588 धावा चोपल्या आहेत. यामध्ये तीन शथक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. राहुल 451 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने यंदाच्या हंगामात दोन शतक आणि दोन अर्धसतके लगावली आहेत. शिखर धवनने तीन अर्धशतकासह 369 धावा चोपल्या आहेत. अभिषेक शर्माला शिखर धवनचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. अभिषेक शर्माने यंदाच्या हंगामात दमदार फलंदाजी केली आहे. अभिषेक शर्माने श्रेयस अय्यर, फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, विल्यमसन, वॉर्नरसारख्या फलंदाजांना मागे टाकलेय. 


दिल्ली विरुद्ध हैदराबाद Head to Head
आयपीएलमध्ये आजवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Delhi Capitals vs sunrisers hyderabad) हे संघ तब्बल 20 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता हैदराबादचं (SRH) पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने (DC) 9 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. यंदा दोघांचाही फॉर्म समसमान असल्याने आजचा सामना चुरशीचा होऊ शकतो हे नक्की.