DC vs SRH IPL 2025 : दिल्लीने हैदराबादला चारली पराभवाची धूळ, 24 चेंडू बाकी असताना 7 विकेट्सनी जिंकला सामना; स्टार्कनंतर फाफ डु प्लेसिस चमकला

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad : आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद पहिल्यांदाच आमने-सामने येत आहेत.

किरण महानवर Last Updated: 30 Mar 2025 06:46 PM

पार्श्वभूमी

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad, 10th Match Cricket Score : दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादला 7 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा...More

दिल्लीने हैदराबादला चारली पराभवाची धूळ, 24 चेंडू बाकी असताना 7 विकेट्सनी जिंकला सामना; स्टार्कनंतर फाफ डु प्लेसिस चमकला

गोलंदाजांनंतर फलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा सात विकेट्सने पराभव करून आयपीएल 2025 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 18.4 षटकांत 163 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्लीकडून फाफ डू प्लेसिसने अर्धशतक झळकावले आणि 16 षटकांत तीन गडी बाद 166 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. सनरायझर्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.