DC vs RCB, IPL 2023 Live: दिल्ली आणि आरसीबी यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

DC vs RCB Live Score: आज दिल्लीच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 06 May 2023 10:56 PM
दिल्लीचा आरसीबीवर सात विकेटन विजय

दिल्लीचा आरसीबीवर सात विकेटन विजय... 

दिल्लीला तिसरा धक्का

कर्ण शर्माने फिलिप साल्ट याला बाद केले.. ८१ धावांची खेळी केली

दिल्लीला दुसरा धक्का

मिचेल मार्शच्या रुपाने दिल्लीला दुसरा धक्का बसला.. मार्श २६ धावा काढून बाद झालाय

दिल्लीला पहिला धक्का

डेविड वॉर्नरच्या रुपाने दिल्लीला पहिला धक्का बसलाय. १४ चेंडूत वॉर्नरने २२ धावांची खेळी केली. हेजलवूडने वॉर्नरला बाद केले

फिल साल्ट आणि डेविड वॉर्नरची वादळी सुरुवात

फिल साल्ट आणि डेविड वॉर्नरची वादळी सुरुवात.... २७ चेंडूत ५७ धावा केल्या... साल्ट १५ चेंडूत ३४ धावांवर खेळत आहे.


 

दिल्लीला विजयासाठी 182 धावांचे आव्हान

विराट कोहली आणि महिपाल लोमरोर यांच्या अर्धशतकाच्या बळावर आरसीबीन निर्धारित 20 षटकात 181 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून मिचेल मार्श याने दोन विकेट घेतल्या. महिपाल लोमरोर याने नाबाद ५४ धावांची खेळी केली. दिल्लीला विजयासाठी 182 धावांची गरज आहे.

विराट कोहलीचे अर्धशतक

रनमशीन विराट कोहली याने आज पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने पहिल्यापासूनच संयमी फलंदाजी करत आऱसीबीची धावसंख्या वाढवली. विराट कोहलीने आयपीएलमध्ये अर्धशतकाचे अर्धशतक झळकावले. त्याशिवाय आयपीएमध्ये सात हजार धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीने केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने आज पुन्हा एकदा अर्धशतक झळकावत आरसीबीच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये सहावे अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने ४६ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने पाच चौकार लगावले. विराट कोहलीने पहिल्या विकेटसाठी कर्णधार फाफ डु प्लेसिससोबत ८२ धावांची भागिदारी केली. तर तिसऱ्या विकेटसाठी महिपाल लोमरोर याच्यासोबत अर्धशतकी भागिदारी केली. 

महिपाल लोमरोरचे अर्धशतक -

मॅक्सवेल आणि फाफ बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोर याने विराट कोहलीची चांगली साथ दिली. विराट कोहली बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोर याने सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. महिपाल लोमरोर याने कार्तिकसोबत आरसीबीच्या डावाला आकार दिला. लोमरोर याने अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. महिपाल लोमरोर याचे आयपीएलमधील हे पहिले अर्धशतक होय.. तीन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने महिपाल याने अर्धशतक झळकावले. 

फाफची निर्णायाक खेळी - 

 


विराट कोहली आणि फाफ यांनी पहिल्या दोन षटकात सयंमी फलंदाजी केली. त्यानंतर फाफ डु प्लेसिस याने आक्रमक रुप धारण केले. विराट कोहलीने एक बाजू लावून धरली होती.. दुसऱ्या बाजूला फाफने आक्रमक फलंदाजी करत आरसीबीची धावसंख्या वाढवली. फाफ डु प्लेलिस याने ३२ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. यामध्ये फाफने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. मिचेल मार्श याने फाफ डु प्लेसिस याची आक्रमक खेळी संपुष्टात आणली. मॅक्सेवल याला आज खातेही उघडता आले नाही. दिनेश कार्तिक याने नऊ चेंडूत ११ धावांचे योगदान दिले. यामध्ये एका षटकाराचा समावेश होय. अनुज रावत याने अखेरीस तीन चेंडूत नाबाद आठ धावांची खेळी केली.

आरसीबीची 181 धावांपर्यंत मजल

आरसीबीची 181 धावांपर्यंत मजल

आरसीबीला चौथा धक्का

दिनेश कार्तिकच्या रुपाने आरसीबीला चौथा धक्का बसलाय. कार्तिकने ९ चेंडूत ११ धावांची खेळी केली.

महिपाल लोमरोरची अर्धशतकी खेळी

महिपाल लोमरोरची अर्धशतकी खेळी... २६ चेंडूत झळकावले अर्धशतक

आरसीबीला तिसरा धक्का, विराट कोहली बाद

आरसीबीला तिसरा धक्का, विराट कोहली बाद झालाय... अर्धशतकानंतर विराट कोहली बाद झालाय.

विराट कोहलीचे अर्धशतकाचे अर्धशतक

विराट कोहलीने अर्धशतकाचे अर्धशतक झळकावले...

आरसीबीला दुसरा धक्का

ग्लेन मॅक्सवेलच्या रुपाने आरसीबीला दुसरा धक्का बसला आहे. मिचेल मार्श याने मॅक्सवेल याला खातेही उघडू दिले नाही.. आरसीबी दोन बाद ८२ धावा

१०.१ षटकानंतर आरसीबी एक बाद ८२ धावा

१०.१ षटकानंतर आरसीबी एक बाद ८२ धावा


विराट कोहली ३६ धावांवर खेळत आहे. डु प्लेसिस ४५ धावांवर बाद झाला.. 

आरसीबीला पहिला धक्का

आरसीबीला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार फाफ डु प्लेसिस ४५ धावा काढून बाद झाला

आरसीबीची दमदार सुरुवात

विराट कोहली आणि फाफ यांनी आरसीबीला दमदार सुरुवात करुन दिली.

विराट कोहलीचा नवा विक्रम

विराट कोहलीने आय़पीएलमध्ये सात हजार धावा पूर्ण करण्याचा  विक्रम केलाय

विराट कोहली -फाफ मैदानावर

विराट कोहली -फाफ मैदानावर उतरले आहेत.. दिल्लीकडून खलीलच्या हातात चेंडू

विराट कोहलीने घेतले आशिर्वाद

केदार जाधवला संधी

आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेलिस याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने अनुभवी केदार जाधव याला संधी दिली आहे. तर दिल्लीच्य संघात सर्व गोलंदाज भारतीय आहेत. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. आयपीएलमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीला सामना जिंकणे अनिवार्य आहे.. तर प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला विजय गरजेचाचा आहे.  


 


 


 


 

कोण मारणार बाजी?

आज दिल्लीच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. बंगळुरुनं मागील सामन्यात लखनौ संघाचा पराभव केला आहे. आता विजयी मार्गावर कायम राहण्यासाठी आरसीबी प्रयत्न करेल. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने मागच्या सामन्यात गतविजेता चॅम्पियन गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. आजच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

IPL 2023, RCB Playing 11 : बंगळुरु प्लेईंग 11

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोरमोरल, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, अनुज रावत, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, जोश हेजलवुड.

IPL 2023, DC Playing 11 : दिल्ली प्लेईंग 11


डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, मनीष पांडे, रिले रुसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, पी. सॉल्ट (विकेटकिपर),  कुलदीप यादव, मुकेश कुमार इशांत शर्मा, खलील अहमद

DC vs RCB Head to Head : कुणाचं पारड जड? 

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 29 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरुचं पारड जड दिसून आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 29 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्स संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. एक सामना ड्रॉ झाला. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 190 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


 

Arun Jaitley Stadium Pitch report : कशी असेल खेळपट्टी?

अरुण जेटली स्टेडियमच्या मैदानावर अनेक उच्च मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 50, DC vs RCB : इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier League) 50 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात रंगणार आहे. आज, 6 मे रोजी दिल्लीच्या घरच्या मैदानावर आज या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. दिल्लीतील अरु जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. आरसीबी संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असून दिल्ली संघ सर्वात शेवटच्या दहाव्या क्रमांकावर आहे.


IPL 2023 DC vs RCB : आरसीबी आणि दिल्ली आमने-सामने
आज दिल्लीच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. बंगळुरुनं मागील सामन्यात लखनौ संघाचा पराभव केला आहे. आता विजयी मार्गावर कायम राहण्यासाठी आरसीबी प्रयत्न करेल. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने मागच्या सामन्यात गतविजेता चॅम्पियन गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. आजच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


DC vs RCB Head to Head : कुणाचं पारड जड? 
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 29 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरुचं पारड जड दिसून आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 29 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्स संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. एक सामना ड्रॉ झाला. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 190 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


DC vs RCB, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
आरसीबी (RCB) आणि दिल्ली (DC) यांच्यात आज, 6 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.



IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


Arun Jaitley Stadium Pitch report : कशी असेल खेळपट्टी?
अरुण जेटली स्टेडियमच्या मैदानावर अनेक उच्च मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.


RCB vs DC IPL 2023 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11


IPL 2023, RCB Playing 11 : बंगळुरु संभाव्य प्लेईंग 11
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोरमोरल, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, जोश हेजलवुड.



IPL 2023, DC Playing 11 : दिल्ली संभाव्य प्लेईंग 11
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, रिले रुसो, अमन हकीम खान, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, पीडी सॉल्ट (विकेटकिपर), एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, इशांत शर्मा.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.