DC vs PBKS, IPL 2023 Live: दिल्ली आणि पंजाबमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

DC vs PBKS Live Score: पंजाब आणि दिल्ली यांच्यात लढत... प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी पंजाबला दिल्लीचा अडथळा

नामदेव कुंभार Last Updated: 13 May 2023 11:05 PM
पंजाबचा दिल्लीवर ३१ धावांनी विजय

पंजाबचा दिल्लीवर ३१ धावांनी विजय...

दिल्लीला आठवा धक्का

दिल्लीला आठवा धक्का बसलाय. प्रविण दुबे १६ धावांवर बाद झालाय.

दिल्लीला सातवा धक्का

अमन खानच्या रुपाने दिल्लीला सातवा धक्का बसलाय.

पंजाबचा भेदक मारा, दिल्लीची फलंदाजी फलंदाजी ढेपाळली

पाच षटकत सहा विकेट गमावल्या आहेत..

साल्ट-वॉर्नरची अर्धशतकी भागिदारी

साल्ट-वॉर्नरची अर्धशतकी भागिदारी

वॉर्नर-साल्टची वादळी सुरुवात

वॉर्नर-साल्टची वादळी सुरुवात.. तीन षटकात २९ धावांची भागिदारी

पंजाबची १६७ धावांपर्यंत मजल

पंजाबची १६७ धावांपर्यंत मजल

शाहरुख खान बाद

शाहरुख खान दोन धावांवर बाद.. पंजाबला सातवा धक्का 

प्रभसिमरनचे वादळी शतक

प्रभसिमरनचे वादळी शतक.. ६५ चेंडूत झळकावले शतक

पंजाबला पाचवा धक्का

पंजाबला पाचवा धक्का... हरप्रीत ब्रार बाद

पंजाबला मोठा धक्का

सॅम करनच्या रुपाने पंजाबला चौथा धक्का.. सॅम करनला २० धावांवर प्रविण दुबेने केले बाद

प्रभसिमरनचे अर्धशथक

पंजाबचा डाव ढेपाळला

पंजाबची फलंदाजी ढेपाळली आहे. पंजाबने पारप्लेमध्ये तीन विकेट गमाल्या आहेत. यंदा पंजाबने पावरप्लेमध्ये तीन वेळा तीन विकेट गमावल्या आहेत.

पंजाबला तिसरा धक्का

जितेश शर्मा पाच धावांवर बाद झालाय. अक्षर पटेलने पाठवले तंबूत

पंजाबला आणखी एक धक्का

पंजाबला आणखी एक धक्का... लिव्हिंगस्टोन बाद

पंजाबला पहिला धक्का

कर्णधार शिखर धवनच्या रुपाने पंजाबला पहिला धक्का बसलाय. ईशांत शर्माने शिखर धवन याने बाद केलेय.

Arun Jaitley Stadium Pitch Report : अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे? 

अरुण जेटली स्टेडियमच्या मैदानावर अनेक उच्च मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग 11 : 

डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिले रुसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार

पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन : 

प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रजा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषि धवन, राहुल चाहर, अर्शदीप सिंह

दिल्लीने नाणेफेक जिंकली

दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 59, DC vs PBKS: 


 इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) च्या 59 व्या सामन्यात आज पंजाब (Punjab Kings) आणि दिल्ली (DC vs PBKs) संघ आमने-सामने येणार आहेत. दिल्लीच्या घरच्या मैदानावर, अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) 13 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यात पराभवानंतर आज मैदानात उतरतील. विशेष म्हणजे चेन्नई विरुद्धचा सामना हरल्यानंतर आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दिल्ली संघांच्या आशेवर पाणी फिरलं आहे. मात्र, पंजाब संघासाठी ही अखेरची संधी असेल. त्यामुळे पंजाब संघाला आजचा सामना जिंकण फार महत्त्वाचं आहे.


प्लेऑफमध्ये स्थान कायम राखण्यासाठी पंजाब किंग्स (Punjab Kings) संघांसाठी आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. तर दिल्ली (Delhi Capitals) संघ आधीच प्लेऑफमधून बाहेर गेल्यामुळे संघाकडे आता हरण्यासाठी काही शिल्लक नाही, पण पंजाबचा प्लेऑफपर्यंतचा मार्ग खडतर करण्याची संधी दिल्ली संघाकडे आहे. त्यामुळे दिल्ली पंजाबला पुरेपुर टक्कर देण्याचा प्रयत्न करेल.


आयपीएल गुणतालिकेमध्ये पंजाब किंग्स संघ आठव्या स्थानावर आहे. संघाकडे दहा गुण आहेत. पंजाब संघाने आतापर्यंतच्या 11 सामन्यांपैकी पाच सामने जिंकले तर सहा सामने गमावले आहेत. या उलट दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी असून संघाकडे आठ गुण आहेत. दिल्ली संघाला यंदाच्या हंगामातील 11 पैकी फक्त चार सामने जिंकता आले असून सात सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे.


DC vs PBKS Head to Head : हेड टू हेड आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि पंजाब किंग्स (PBKS) संघ एकूण तीस सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये दोन्ही संघाची परिस्थिती समान आहे. दिल्ली आणि पंजाब दोन्ही संघानी प्रत्येकी 15-15 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्या दिल्ली आणि पंजाब या दोन संघांपैकी कोणता संघ वरचढ ठरणार हे पाहावं लागेल.









IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


पंजाब किंग्स (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज 13 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.