DC vs KKR, IPL 2022 : दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडेच्या मैदानावर दिल्ली आणि कोलकातामध्ये सामना रंगला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर कोलकाताचा संघ प्रथम फंलदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.


कोलकातामध्ये तीन बदल - 
श्रेयस अय्यरने अंतिम 11 मध्ये तीन बदल केले आहेत. विकेटकिपर फलंदाज बाबा इंद्रजीतला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय एरॉन फिंचचे पुनरागमन झालेय. त्याशिवाय दिल्लीच्या ह्रषित राणालाही संधी देण्यात आली आहे. कोलकात्याने फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला वगळले आहे. कोलकात्याने शिवम मावी आणि सॅम बिलिंग्सला आराम दिलाय. 


दिल्लीच्या संघात दोन बदल - 
कोरोनातून सावरल्यानंतर दिल्लीच्या संघात मिचेल मार्शचं पुनरागमन झालेय. त्याशिवाय खलील अहमदच्या जागी चेतन साकरियाला संधी देण्यात आली आहे.


कोलकात्याची प्लेईंग 11 - 
अॅरॉन फिंच, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, नितीश राणा, बाबा इंद्रजीत (विकेटकिपर), आंद्रे रसेल, सुनिल नारायण, उमेश यादव, हर्षीत राणा, टीम साऊथी


दिल्लीची प्लेईंग 11 - 
पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), रॉवमन पॉवेल, अक्षऱ पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रेहमान, चेतन सकारिया


पिच रिपोर्ट - 
आजचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. मैदानात सुरुवातीचे काही सामने हे चेस करणाऱ्या संघाच्या दिशेने झुकलेले पाहायला मिळालं. पण मागील काही सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होताना दिसत आहे. इतर मैदानांपेक्षा काहीसं छोटं मैदान असल्याने षटकार, चौकारांची बरसात याठिकाणी होत असते. त्यामुळे वानखेडे मैदानात मोठी धावसंख्या उभी राहताना दिसते. पण आजचा सामना  सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी घेण्याचे समसमान चान्सेस आहेत.


Head to Head
आयपीएलमध्ये आजवर  दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) हे संघ तब्बल 30 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता कोलकात्याचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 16 सामन्यात विजय मिळवला आ