DC Vs GT LIVE Score Updates, IPL 2024 :दिल्ली की गुजरात विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार, रिषभ पंत की शुभमन गिल कोण बाजी मारणार?

Delhi Capitals Vs Gujarat Titans LIVE Score Updates, IPL 2024 : आयपीएलमधील 32 वी मॅच दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

युवराज जाधव Last Updated: 17 Apr 2024 10:14 PM
दिल्लीचा सहा विकेटनं विजय

दिल्लीचा सहा विकेटनं विजय

दिल्लीला चौथा धक्का

शाय होपच्या रुपाने दिल्लीला चौथा धक्का

दिल्लीला तिसरा धक्का

अभिषेक पोरेल बाद.. दिल्लीला तिसरा धक्का.. संदीप वॉरियरनं घेतली विकेट

दिल्लीला दुसरा धक्का

पृथ्वी शॉ सात धावांवर बाद झाला. दिल्लीला दुसरा धक्का बसलाय

दिल्लीला पहिला धक्का

फ्रेजर मॅक्गर्क 10 चेंडूमध्ये 20 धावा काढून बाद

89 धावांवर गुजरातचा संघ तंबूत

89 धावांवर गुजरातचा संघ तंबूत

गुजरातला नववा धक्का

राशिद खानच्या रुपाने गुजरातला नववा धक्का बसला आहे. राशिद खान 31 धावा काढून बाद झाला. गुजरात 9 बाद  88 धावा

गुजरातला आठवा धक्का

मोहित शर्माच्या रुपाने गुजरातला आठवा धक्का बसला आहे. मोहित शर्माने 14 चेंडूमध्ये दोन धावा केल्या. 

गुजरातची दैयनीय स्थिती

दिल्लीच्या भेदक माऱ्यापुढे गुजरातची अवस्था दैयनीय झाली आहे. गुजरातने 70 धावांमध्येच 7 विकेट गमावल्या आहेत. 

गुजरातची फलंदाजी ढेपाळली

डेविड मिलरही बाद झाला. गुजारताला चौथा धक्का बसलाय. दिल्लीच्या गोलंदाजांचा भेदक मारा

गुजरातची फलंदाजी ढेपाळली

साई सुदर्शन धावबाद झाला.. 12 धावा काढून परतला तंबूत

गुजरातला दुसरा धक्का

मुकेश कुमारनं साहाचा उडवला त्रिफाळा.. गुजरातला दुसरा धक्का

गुजरातला पहिला धक्का

कर्णधार शुभमन गिल स्वस्तात बाद झाला. ईशांत शर्मानं गिलला पाठवलं तंबूत

दिल्लीच्या संघात तीन बदल

संदीप वॉरियरचं गुजरातच्या संघात पदार्पण.. साहा आणि मिलरही परतले.. 

डेविड वॉर्नर बेंचवर

दुखापतीमुळे डेविड वॉर्नर आजच्या सामन्यात खेळणार नाही. दिल्लीच्या संघात कोणताही बदल नाही. 

दिल्लीनं नाणेफेक जिंकली

ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

GT vs DC : मिशेल मार्श जखमी असल्यानं दिल्लीला धक्का

दिल्ली कॅपिटल्सला मिशेल मार्श दुखापतीमुळं अनिश्चित काळासाठी संघाबाहेर गेल्यानं दिल्लीला धक्का बसला आहे.

RCB : आयपीएलच्या, खेळाडूंच्या, चाहत्यांच्या भल्यासाठी आरसीबीची टीम नव्या मालकाला विका, दिग्गज खेळाडूची बीसीसीआयकडे मागणी

आरसीबीच्या या खराब कामगिरीवर भारताचा दिग्गज टेनिस खेळाडू महेश भूपतीनं (Mahesh Bhupati) नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं बीसीसीआयकडे मोठी मागणी केली आहे.

GT vs DC : गुजरातला गुड न्यूज मिळण्याची शक्यता, डेव्हिड मिलर संघात कमबॅक करणार?

गुजरात टायटन्सचा खेळाडू डेव्हिड मिलर फिट होऊन संघात परतण्याची शक्यता आहे. यामुळं शुभमन गिलला मोठा दिलासा मिळू शकतो. 

GT vs DC : गुजरात दिल्ली किती वेळा आमने सामने?

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत तीन वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये दोनवेळा गुजरातनं विजय मिळवला तर  एका मॅचमध्ये दिल्लीनं विजय मिळवला आहे. 

GT vs DC : गुजरात टायटन्सला मोहम्मद शमी आणि डेव्हिड मिलर नसल्याचा फटका

 गुजरात टायटन्सला मोहम्मद शमी आणि डेव्हिड मिलर नसल्याचा फटका बसत आहे. 

GT vs DC : गुजरात गुणतालिकेत सहाव्या स्थानावर

गुजरात टायटन्स तीन सामन्यातील विजय आणि तीन पराभवासह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. 

दिल्ली गुणतालिकात नवव्या स्थानावर

दिल्ली  कॅपिटल्स गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. आजच्या मॅचमध्ये गुजरातला पराभूत करण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल. 

DC vs GT : दिल्ली तिसऱ्या विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरणार

दिल्ली कॅपिटल्सनं चेन्नई सुपर किंग्ज आणि गेल्या मॅचमध्ये लखनौ सुपर जाएंटसला पराभूत केलं आहे. लखनौ सुपर जाएंटसला पराभूत केल्यानंतर दिल्लीचं मनोधैर्य वाढलं आहे. दिल्ली तिसऱ्या विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरेल.

GT vs DC : गुजरात विजयाचा ट्रेंड सुरु ठेवणार?

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज लढत होणार आहे. गुजरातनं आतापर्यंत तीन मॅचमध्ये विजय मिळवला असून तीनवेळा पराभव स्वीकारला आहे. 

पार्श्वभूमी

DC Vs GT LIVE Score Updates, IPL 2024 :आज आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलमधील 32 वी मॅच होत आहे.गुजरातनं राजस्थानला पराभूत केल्यानंतर ते विजयाच्या आत्मविश्वासानं मैदानात उतरतील. दुसरीकडे लखनौ सुपर जाएंटसला पराभूत करत दिल्लीला देखील विजयाचा सूर गवसला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातनं तीन मॅच जिंकल्या आहेत. तर दिल्लीनं दोन मॅच जिंकलेल्या आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.