CSK vs KKR Match Preview : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. 16 व्या हंगामातील 33 वा सामना आज, 23 एप्रिलला कोलकाताच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमवर (Eden Gardens Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. 


CSK vs KKR IPL 2023 : चेन्नई की कोलकाता कोण ठरणार वरचढ?


इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 33 व्या सामन्यात रविवारी, 23 कोलकाता आणि चेन्नई यांच्यातील सामना ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. नितीश राणाच्या नेतृत्त्वात कोलकाता संघ पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे तर, चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने मागील सामन्यात हैदराबाद संघाचा पराभव केला. तसेच कोलकाता संघ दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर आज चेन्नई विरुद्ध मैदानात उतरणार आहे






CSK vs KKR Head To Head : हेड टू हेड आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई (CSK) आणि कोलकाता (KKR) या संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं पारड जड आहे. चेन्नई संघाने 27 पैकी 17 सामने जिंकले असून कोलकाता संघाला फक्त 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


CSK vs KKR IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


चेन्नई (Chennai Super King) आणि कोलकाता (Kolkata Knight Riders) या दोन संघामध्ये 23 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलकाता ईडन गार्डन स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


RCB vs RR Match Preview : राजस्थान आणि बंगळुरु आमने-सामने, हेड टू हेड आकडेवारीत कुणाचं पारड जड? जाणून घ्या...