CSK vs KKR IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सचा 7 विकेट्सने विजय
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders: केकेआरने प्रथम फलंदाजी करत 137 धावा केल्या होत्या.
चेन्नई सुपर किंग्सने कमी धावसंख्येच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून पराभव केला.
15 षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या 2 बाद 115 धावा आहे. आता चेन्नईला विजयासाठी 30 चेंडूत केवळ 23 धावा करायच्या आहेत. रुतुराज गायकवाड 54 चेंडूत 60 धावांवर खेळत आहे. तर शिवम दुबे 9 चेंडूत 10 धावांवर खेळत आहे.
सुनील नरेनने 13व्या षटकात केकेआरला दुसरे यश मिळवून दिले. मात्र तरीही सामना पूर्णपणे चेन्नईच्या हातात आहे. मिचेल 19 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. दुसऱ्या टोकाला गायकवाड 48 चेंडूत 52 धावांवर खेळत आहे. चेन्नईला येथून विजयासाठी 45 चेंडूत 41 धावा करायच्या आहेत.
12 षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या एका विकेटवर 96 धावा आहे. गायकवाड 46 चेंडूंत सात चौकारांसह 51 धावांवर खेळत आहे. तर डेरिल मिशेल 18 चेंडूत 25 धावांवर खेळत आहे. आता चेन्नईला विजयासाठी 48 चेंडूत फक्त 42 धावा करायच्या आहेत.
आज चेन्नईविरुद्ध मोठी खेळी खेळण्यास रिंकू सिंगला अपयश आले. तुषार देशपांडेने त्याला अवघ्या 9 धावांवर बाद केले.
केकेआरची अवस्था अत्यंत वाईट आहे. अतिशय संथ गतीने धावा केल्या जात आहेत. 15 षटकांनंतर कोलकाताची धावसंख्या 5 विकेटवर 99 धावा आहे. श्रेयस अय्यर 23 चेंडूत 20 धावांवर खेळत आहे. त्याने चौकार मारला आहे. त्याच्यासोबत रिंकू सिंग आठ चेंडूत चार धावांवर खेळत आहे.
केकेआर संघाचे पाच फलंदाज बाद झाले आहेत. महेश तीक्षणाने रणदीपला बाद करत केकेआरला पाचवा धक्का दिला.
10 षटकांत केकेआरची धावसंख्या 4 विकेट गमावत 70 धावांवर पोहचली आहे. फिरकीपटूंना खेळपट्टीवर मदत मिळत असल्याचे दिसत आहे. चेन्नईचा गोलंदाज रवींद्र जडेजाने दोन आतापर्यंत दोन षटकांत तीन फलंदाजांना माघारी पाठवले आहे.
केकेआरचे तीन फलंदाज माघारी परतले आहे. चेन्नईचा फिरकीपटू रवींद्र जडेजाने वैयक्तिक पहिल्याच षटकांत अंगकृष रघुवंशी आणि सुनील नरेनला बाद केले.
केकेआरला पहिल्याच चेंडूत धक्का बसला आहे. आक्रमक फलंदाज फिलिप सॉल्टला सीएसकेचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने माघारी पाठवले.
चेपॉकमध्ये चेन्नईला पराभूत करणे केकेआरसाठी कठीण काम असणार आहे. या मैदानावर आतापर्यंत चेन्नई आणि केकेआर यांच्यात 10 वेळा सामना झाला आहे. यामध्ये चेन्नईने सात वेळा विजय मिळवला आहे. तर कोलकाताने केवळ तीन सामने जिंकले आहेत.
फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, श्रेयस अय्यर, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, मिस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा
चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम स्टेडियमवर नेहमीच फिरकी गोलंदाजांचा दबदबा असल्याचं आकडे सांगतात. पण यंदाच्या वर्षातील खेळपट्टी वेगळी असल्याचं दिसते. यंदाच्या हंगामात या मैदानावर दोन सामने झाले आहेत, त्या सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली, तर फिरकी गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. या खेळपट्टीवर फलंदाजांचा दबदबा दिसला. चेन्नईने या मैदानावर 200 धावांचा पल्ला आरामात पार केला होता. त्याशिवाय आरसीबीने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आरामात केला होता. आजच्या सामन्यातही फलंदाजांचा दबदबा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आयपीएल 2024 च्या हंगामात केकेआरने तीन समाने खेळले आहेत. या तीनही सामन्यात केकेआरने विजय मिळवला आहे. या हंगामातील आज केकेआर चेन्नईविरुद्ध चौथा सामना खेळणार आहे.
सुनील नरेन, फिल साल्ट, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट प्लेयर- सुयश शर्मा.
रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डेरिल मिचेल, रवींद्र जड़ेजा, समीर रिजवी/मिचेल सेंटनर, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.
इम्पॅक्ट प्लेयर- मुकेश चौधरी
पार्श्वभूमी
CSK vs KKR IPL 2024: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (kolkata knight riders) यांच्यात सामना सुरु आहे. केकेआरने प्रथम फलंदाजी करत 137 धावा केल्या होत्या. या प्रत्युत्तरात चेन्नईने 7 विकेट्स राखत सहज विजय मिळवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -