CSK Vs GT LIVE Score Updates, IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्ज अन् गुजरात टायटन्स आमने सामने, ऋतुराज गायकवाडसह शुभमन गिलची परीक्षा

Chennai Super Kings Vs Gujarat Titans LIVE Score Updates, IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सातवी मॅच चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

युवराज जाधव Last Updated: 26 Mar 2024 11:28 PM
चेन्नईचा 63 धावांनी विजय

चेन्नईचा 63 धावांनी विजय

गुजरातला आठवा धक्का

तेवातियाच्या रुपाने गुजरातला आठवा धक्का बसला आहे. चेन्नईचा विजय जवळपास निश्चित

गुजरातला सातवा धक्का

गुजरातला सातवा धक्का बसला आहे. राशिद खान एका धावेवर बाद झाला आहे. 

गुजरातला सहावा धक्का

तुषार देशपांडेने गुजरातला दिला सहावा धक्का, उमराजई स्वस्तात बाद

गुजरातचा अर्धा संघ तंबूत

गुजरातचा अर्धा संघ तंबूत.. साई सुदर्शन 37 धावांवर बाद

गुजरातला चौथा धक्का

डेविड मिलरच्या रुपाने गुजरातला चौथा धक्का बसलाय

गुजरातची खराब सुरुवात

207 धावांच्या आव्हनाचा पाठलाग करताना गुजरातची अतिशय खराब सुरुवात झाली. 72 धावांत 3 फलंदाज गमावले आहेत.  कर्णधार शुभमन गिल 8, वृद्धीमान साहा 21 आणि विजय शंकर 12 धावा काढून बाद झाले. 

चेन्नईचं गुजरातसमोर 207 धावांचं आव्हान

 रचीन रविंद्रची आक्रमक सुरुवात आणि शिवम दुबे याचं झंझावती अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने निर्धारित 20 षटकांमध्ये 6 विकेटच्या मोबदल्यात 206 धावांपर्यंत मजल मारली. शिवम दुबेने 51 धावांचा पाऊस पाडला. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी 46 धावा केल्या. अखेरीस समीर रिझवी याने झटपट धावा केल्या. गुजरातकडून राशिद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. गुजरातला चेपॉकवर सामना जिंकण्यासाठी 207 धावांची गरज आहे. 

चेन्नईला पाचवा धक्का

चेन्नईला पाचवा धक्का बसला आहे. रिझवी 6 चेंडूत 14 धावा काढून बाद झाला

दुबे बाद

मोक्याच्या क्षणी शिवम दुबे बाद झाला. राशिद खान यानं घेतली विकेट

शिवम दुबेचं अर्धशतक

चेपॉकवर शिवम दुबे यानं विस्फोटक फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. दुबेने फक्त 21 चेंडूमध्ये अर्धशतक केले

चेन्नईची 200 धावसंख्येकडे वाटचाल

चेन्नईने 200 धावसंख्येकडे वाटचाल सुरु आहे. ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र यांनी चेन्नईच्या धावसंख्येला आकार दिला. तर शिवम दुबे यानं वेगाने धावसंख्या वाढवली. 16.7 षटकानंतर चेन्नई 3 बाद 171 धावा

चेन्नईची 200 धावसंख्येकडे वाटचाल

चेन्नईने 200 धावसंख्येकडे वाटचाल सुरु आहे. ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र यांनी चेन्नईच्या धावसंख्येला आकार दिला. तर शिवम दुबे यानं वेगाने धावसंख्या वाढवली. 16.7 षटकानंतर चेन्नई 3 बाद 171 धावा

चेन्नईला दुसरा धक्का

साई किशोरने चेन्नईला दिला दुसरा धक्का, अजिंक्य राहणे 12 धावांवर बाद... चेन्नई 2 बाद 104 धावा

चेन्नईला पहिला धक्का

विस्फोटक फलंदाजी करणारा रचिन रवींद्र बाद झालाय. 20 चेंडूत 46 धावांची खेळी केली. चेन्नईनं 62 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली.

चेन्नईचं अर्धशतक

रचिन रवींद्र यानं विस्फोटक फलंदाजी करत गुजरातची गोलंदाजी फोडून काढली. चेन्नईने 4.3 षटकात बिनाबद 52 धावा केल्या आहेत. रचिन रवींद्र यानं 16 चेंडूत 37 धावांवर खेळत आहे. 

चेन्नईची वेगवान सुरुवात

ऋतुराज गायकवाड आणि रचीन रविंद्र यांची वेगवान सुरुवात.. गुजरातची गोलंदाजी फोडली.. 3.4 षटकातच फलकावर लावल्या 40 धावा.. रचिन रवींद्रने चौकारांचा पाडला पाऊस

गुजरातची प्लेईंग 11

वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), विजय शंकर, अजमतुल्हा उमरजई, डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, आर. साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेंसर जॉन्सन


राखीव खेळाडू - 


साई सुदर्शन, बीआर शरथ, अभिनव मनोहर, नूर अहमद

चेन्नईची प्लेईंग 1

रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य राहणे, डेरिल मिचेल, शिवब दुबे, रवींद्र जाडेजा, समीर रिझवी, एम.एस धोनी(विकेटकीपर), दीपक चाहर, मुस्तफिजुर रहमन, तुषार देशपांडे


राखीव खेळाडू - शार्दूल ठाकूर, मथिशा पथिराणा, निशांत सिंधू, शेख रशीद

चेन्नईची प्रथम फलंदाजी

गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऋतुराज गायकवाडचा चेन्नई संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. 

GT vs CSK : गुजरात आणि चेन्नई यांच्यात टॉस किती वाजता होणार?

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात टॉस सायकाळी 7 वाजता होईल. प्रत्यक्ष मॅच 7.30 मिनिटांनी सुरु होईल.

GT vs CSK : चेपॉकवर आज पाऊस पडेल काय?

GT vs CSK : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणाऱ्या मॅचवर पावसाचं सावट नसेल. मात्र, उष्णता आणि आर्द्रता यासह क्रिकेट खेळणं आव्हानात्मक असेल. चेन्नईत तापमान 30 अंशाच्या वर जाऊ शकतं तर आर्द्रता 70 पर्यंत असेल.

GT vs CSK : गुजरातचे सर्व खेळाडू मॅचसाठी फिट

GT vs CSK : गुजरातचे सर्व खेळाडू मॅचसाठी फिट आणि उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. 

CSK Vs GT : लीग स्टेजमध्ये गुजरात सीएसकेविरुद्ध अजिंक्य 

गुजरात टायटन्सनं लीग स्टेजमध्ये 2022 पासून चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलं आहे. चेन्नईनं अंतिम फेरीत गुजरातला पराभूत केलं होतं.

CSK Vs GT : मथिशा पथिरानाचं चेन्नईच्या टीममध्ये कमबॅक 

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना यानं चेन्नई सुपर किंग्जमध्ये कमबॅक केलं आहे. चेन्नईचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

CSK vs GT : गुजरात फायनलच्या पराभवाचा वचपा काढणार?

आयपीएलच्या 16 व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सला फायनलमध्ये पराभूत करत विजेतेपद पटकावलं होतं.आजच्या सामन्यात ते त्या पराभवाची परतफेड  करणार का हे पाहावं लागेल.  

CSK vs GT : चेन्नई आणि गुजरात आज आमने सामने

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स आज आमने सामने येणार आहेत. ही मॅच चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे.  

पार्श्वभूमी

चेन्नई : आयपीएलच्या  17 (IPL 2024) व्या पर्वातील सातवी मॅच चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे.  चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans ) यांच्यात ही लढत पार पडेल.  चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सनं  या हंगामात एक एक मॅच जिंकली आहे. यापूर्वी दोन्ही संघ 2023 च्या आयपीएलच्या फायनलमध्ये आमने सामने आले होते. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. आता गुजरात त्या पराभवाचा वचपा आज काढणार की नाही हे पाहावं लागेल. दुसरीकडे दोन्ही टीम्समध्ये जो संघ विजय मिळवेल तो गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचणार आहे. यावेळी चेन्नई आणि गुजरातच्या टीमचं नेतृत्त्व देखील युवा खेळाडूंकडे देण्यात आलं आहे. चेन्नईचं नेतृत्त्व ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) तर गुजरातचं नेतृत्त्व शुभमन गिल (Shubman Gill) करत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.