CSK Vs DC LIVE Updates: चेन्नईनं सामना जिंकला, दिल्लीचा 91 धावांनी पराभव

IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) चेन्नई सुपर किंग्ज आणि  दिल्ली कॅपिटल्स (CSK Vs DC) यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 55 वा खेळला जात आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 May 2022 11:18 PM
चेन्नईनं सामना जिंकला, दिल्लीचा 91 धावांनी पराभव

CSK Vs DC: चेन्नईच्या (Chennai Super Kings) भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या (Delhi Capitals) संघाची दमछाक झाली. मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघानं 91 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं सलामीवीर डेव्हॉन कॉनवेच्या (Devon Conway) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर  दिल्लीसमोर 20 षटकात 209 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 117 धावांचं करू शकला. चेन्नईकडून मोईन अली Moeen Ali),  सिमरजीत सिंह आणि मुकेश चौधरीनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. 

चेन्नईची आक्रमक गोलंदाजी, दिल्लीचे सात फलंदाज पव्हेलियनमध्ये परतले

दिल्लीविरुद्ध आजच्या सामन्यात चेन्नईच्या संघानं आक्रमक गोलंदाजी केली आहे. 85 धावांवर दिल्लीचे सात फलंदाज आऊट झाले आहेत. 

CSK vs DC, IPL 2022 : दिल्लीला चौथा धक्का, मोईन अलीच्या गोलंदाजीवर रिपाल पटेल आऊट

दिल्लीविरुद्ध सामन्यात मोईन अलीनं चमकदार कामगिरी केली आहे. या सामन्यात त्यानं तीन विकेट्स घेऊन जोरदार कमबॅक केलं आहे. 


 

CSK vs DC, IPL 2022 : दिल्लीला तिसरा धक्का, मोईन अलीनं मिचेश मार्शला माघारी धाडलं

चेन्नईनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाची छपछाप झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोईन अलीनं मिचेश मार्शच्या रुपात दिल्लीला तिसरा धक्का दिला आहे. 


 

CSK vs DC, IPL 2022: चेन्नईचं दिल्लीसमोर 209 धावांचं आव्हान

मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 55 व्या सामन्यात चेन्नईच्या संघानं दिल्लीसमोर (Chennai Super Kings vs Delhi Capitals)  209 धावांचं आव्हान ठेवलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात विकेट्स गमावून धावा केल्या आहेत. चेन्नईकडून डेव्हॉन कॉन्वेनं (Devon Conway) तुफानी अर्धशतक ठोकलं.

CSK vs DC, IPL 2022: शिवम दुबेच्या रुपात चेन्नईला तिसरा झटका

चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियवर आयपीएल 2022 मधील 55 सामना खेळला जात आहे.  शिवम दुबेच्या रुपात चेन्नईला तिसरा झटका लागलाय.

CSK vs DC, IPL 2022: चेन्नईच्या संघानं दुसरी विकेट गमावली, डी कॉन्वे 87 धावांवर बाद

दिल्लीविरुद्ध सामन्यात डी कॉन्वेनं तडाखेबाज फलंदाजी केली. त्यानं 49 चेंडूत 87 धावा केल्या आहेत. ज्यात पाच षटकार आणि सात चौकारांचा समावेश आहे. 

CSK vs DC, IPL 2022: चेन्नईच्या संघाला पहिला धक्का, नॉर्टीजेच्या गोलंदाजीवर ऋतुराज बाद

दिल्लीविरुद्ध सामन्यात चेन्नईच्या संघाला ऋतुराज गायकवाडच्या रुपात पहिला धक्का बसलाय. त्यानं 33 चेंडूत 41 धावा केल्या आहेत. 

CSK vs DC, IPL 2022: डेव्हॉन कॉन्वेची तुफान खेळी, 27 चेंडूत ठोकलं अर्धशतक

दिल्लीविरुद्ध सामन्यात डेव्हॉन कॉन्वे आक्रमक खेळी करत आहे. त्यानं 27 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. ज्यात 4 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे. 


 

CSK vs DC, IPL 2022: दिल्लीविरुद्ध चेन्नईची दमदार सुरुवात

मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाचा चांगली सुरुवात झाली आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं पहिल्या तीन षटकात 24 धावा केल्या आहेत.

CSK vs DC, IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन

डेव्हिड वॉर्नर, श्रीकर भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकिपर, कर्णधार), रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्टजे.


 

CSK vs DC, IPL 2022: चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोईन अली, एमएस धोनी (विकेटकिपर, कर्णधार), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, महेश तिक्षणा, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी.

CSK vs DC, IPL 2022: दिल्लीच्या संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 54 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्लीच्या संघाचं नेतृत्व भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत करत आहे. तर, महेंद्रसिंह धोनीकडं पुन्हा चेन्नईच्या संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिल्लीविरुद्ध सामन्यात चेन्नईनं विजय मिळवल्यास आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

चेन्नई- दिल्ली यांच्यात रंगणार थरार; कधी, कुठे आणि कसा पाहायचा सामना?

आज 08 मे रोजी होणारा हा चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


 

CSK Vs DC LIVE Updates: दिल्ली कॅपिटल्स संभाव्य संघ:

डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंह, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, अॅनरिक नॉर्टजे.

CSK Vs DC LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्स संभाव्य संघ:


ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी, महेश तिक्षणा.

CSK Vs DC LIVE Updates: चेन्नई- दिल्ली हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स 26 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी 16 सामन्यात चेन्नईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, दिल्लीच्या संघाला 10 सामन्यात विजय मिळवता आला आहे. आकडेवारी पाहता चेन्नईच्या संघाचं पारडं जड दिसत आहे. 

पार्श्वभूमी

IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) चेन्नई सुपर किंग्ज आणि  दिल्ली कॅपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 55 वा खेळला जात आहे. यंदाच्या हंगाम चेन्नईच्या संघासाठी खराब ठरला आहे. चेन्नईच्या संघाला केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, दिल्लीनं यंदाच्या हंगामात दहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीचा संघ चेन्नईविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 


हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स 26 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी 16 सामन्यात चेन्नईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, दिल्लीच्या संघाला 10 सामन्यात विजय मिळवता आला आहे. आकडेवारी पाहता चेन्नईच्या संघाचं पारडं जड दिसत आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे सामन्याच्या शेवटीच समजणार.


चेन्नई सुपर किंग्स संभाव्य संघ:
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी, महेश तिक्षणा.


दिल्ली कॅपिटल्स संभाव्य संघ:
डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंह, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, अॅनरिक नॉर्टजे.


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.