चेन्नई : आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपर किंग्जनं 9 खेळाडूंना रिलीज केलं आहे. तर, 16 खेळाडूंना रिटेन केलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं डेवाल्ड ब्रेविस, जेमी ओवर्टन, नूर अहमद नॅथन एलिस या चार खेळाडूंना रिटेन केलं आहे. विशेष म्हणजे चेन्नईनं मथीशा पथिराना आणि रचिन रवींद्रला रिलीज केलं आहे.  

Continues below advertisement

Chennai Super Kings Retain Player List : चेन्नईनं रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी

रवींद्र जडेजा आणि सॅम कर्रन या दोघांना चेन्नईनं राजस्थान रॉयल्ससोबत ट्रेड केलं आहे. त्या दोघांच्या जागेवर संजू सॅमसनला चेन्नईनं संघात आणलं. चेन्नई अजून 9 खेळाडूंना संघात घेऊ शकते.  

CSK ची रिटेन्शन यादी: एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन (ट्रेड), शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस, आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, जेमी ओवर्टन, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, नाथन एलिस, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंह

Continues below advertisement

CSK रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी: राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, शेख रशीद, रचिन रवींद्र, विजय शंकर, कमलेश नागरकोटी, मथीशा पाथिराना

CSK च्या पर्समध्ये  43.4 कोटी

चेन्नई सुपर किंग्जच्या स्कॉडमध्ये सध्या 16 खेळाडू आहेत. ऑक्शनमधून चेन्नई अजून 9 खेळाडूंवर बोली लावू शकते. ज्यासाठी  चेन्नईकडे 43.4 कोटी रुपये आहेत. राहिलेल्या 9 खेळाडूंमध्ये 4 खेळाडू विदेशी घ्यावे लागणार आहेत. 

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जची आयपीएलच्या 18 व्या हंगामात खराब कामगिरी झाली होती. चेन्नई सुपर किंग्जला 14 मॅचमध्ये केवळ 4 मॅचमध्ये विजय मिळाला होता. गुणतालिकेत चेन्नई शेवटच्या स्थानावर होती. चेन्नईचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे होतं. मात्र, दुखापतीमुळं तो बाहेर गेल्यानंतर पुन्हा महेंद्रसिंह धोनीला चेन्नईचं नेतृत्त्व करावं लागलं होतं.