Virat Kohli on the slowest hundred in the history of IPL : पाकिस्तानी क्रिकेटर जुनैद खान यानं विराट कोहलीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय चाहत्यांनी जुनैद खान याचं तोंड बंद केले आहे. जुनैद खान यानं विराट कोहलीच्या आयपीएलमधील आठव्या शतकावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर किंग कोहलीच्या चाहत्यांनी जुनैद खान याची शाळाच घेतली. शनिवारी राजस्थानविरोधात विराट कोहलीने शतकी खेळी केली. विराट कोहलीला या शतकासाठी 67 चेंडू लागले, हे आयपीएलमधील सर्वात संथ शतक ठरलं. यावरुन विराट कोहलीला जोरदार ट्रोल करण्यात आले. यामध्ये पाकिस्तानी क्रिकेटरचाही समावेश होता. त्याला भारतीय चाहत्याने उत्तर दिले. विराट कोहलीने शनिवारी राजस्थानविरोधात 72 चेंडूमध्ये 113 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने 12 चौकार आणि चार षटकार लगावले. 

जुनैद खानने विराटवर साधला निशाणा - 

पाकिस्तानी क्रिकेटर जुनैद खान याने विराट कोहलीच्या शतकी खेळीवर निशाणा साधला. जुनैद खान यानं एक्स खात्यावरुन एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये विराट कोहलीच्या शतकी खेळीवर खोचक टिपण्णी केली. जुनैद खान यानं विराट कोहलीच्या संथ खेळीचं अभिनंदन केले. त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,  'आयपीएलच्या इतिहासातील सर्वात संथ शतकासाठी विराट कोहलीला खूप साऱ्या शुभेच्छा!'

जुनैद खान याला भारतीय चाहत्यांनी सडेतोड उत्तर दिलं.  

विराट कोहलीचे आयपीएलमधील संथ शतक  - 

विराट कोहलीने जयपूरमध्ये शनिवारी राजस्थानविरोधात शतकी धमाका केला. पण  विराट कोहलीने या शतकासाठी तब्बल 67 चेंडू खर्च केले. विराट कोहलीचं आयपीएलमधील हे आठवे शतक ठरलं. सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर पोहचला. पण विराट कोहलीचे हे विक्रमी शतक आयपीएलमधील सर्वात संथ शतक ठरलं आहे. विराट कोहलीने मनिष पांडेच्या संथ शतकी खेळीची बरोबरी केली. 2009 मध्ये मनिष पांडे याने दिल्लीविरोधात 67 चेंडूमध्ये शतक ठोकले होते. आता विराट कोहलीने या संथ शतकी खेळीची बरोबरी केली.  आयपीएलमधील संथ शतकं  Slowest Centuries in IPL

67 – मनिष पांडे (आरसीबी) vs डेक्कन चार्जेस 2009

67 – विराट कोहली (आरसीबी) vs राजस्थान रॉयल 2024

66 – सचिन तेंडुलकर (मुंबई इंडियन्स) vs कोच्ची टस्कर्स 2011

66 – डेविड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स) vs कोलकाता नाईट रायडर्स 2010

66 – जोश बटलर (राजस्थान रॉयल्स) vs मुंबई इंडियन्स 2022