CSK vs MI Score IPL 2025 : चेपॉकमध्ये नूर अहमद अन विघ्नेश पुथूर चमकले, चेन्नईचा 4 गडी राखून विजय; रचिन रवींद्र ठरला विजयाचा हिरो

CSK vs MI Match Updates IPL 2025 : आयपीएल 2025मध्ये आज म्हणजेच रविवारी दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला आहे.

किरण महानवर Last Updated: 23 Mar 2025 11:11 PM

पार्श्वभूमी

Chennai Super Kings vs Mumbai Indians 3rd Match Cricket Score : आयपीएल 2025 च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे संघ एकमेकांसमोर आले. या...More

चेपॉकमध्ये नूर अहमद अन विघ्नेश पुथूर चमकले, चेन्नईचा 4 गडी राखून विजय

आयपीएल 2025 चा तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात खेळला गेला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर मुंबईने 20 षटकांत नऊ गडी गमावून 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईने 19.1 षटकांत सहा गडी गमावून 158 धावा केल्या आणि सामना 4 गडी राखून जिंकला.