CSK vs DC IPL 2025 : पुन्हा नाही चालली माहीची जादू, दिल्ली कॅपिटल्सने सीएसकेचा किल्ला जिंकला, विजयी हॅटट्रिक

CSK vs DC Updates IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 17 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळत आहेत.

किरण महानवर Last Updated: 05 Apr 2025 07:17 PM

पार्श्वभूमी

Chennai Super Kings vs Delhi Capitals Updates 2025 : फलंदाजांनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला 25 धावांनी पराभूत केले. दिल्लीचा हा सलग तिसरा विजय आहे आणि...More

चेन्नई सुपर किंग्ज चेपॉकमध्ये पुन्हा पराभव... दिल्ली कॅपिटल्सची विजयी हॅटट्रिक

फलंदाजांनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला 25 धावांनी पराभूत केले. दिल्लीचा हा सलग तिसरा विजय आहे आणि आयपीएल 2025 मध्ये त्यांची अपराजित मोहीम सुरूच आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत सहा गडी गमावून 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात, सीएसकेला 20 षटकांत पाच गडी गमावून फक्त 158 धावा करता आल्या. सीएसकेचा हा सलग तिसरा पराभव आहे. याआधी, त्यांना राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीविरुद्धही पराभव पत्करावा लागला होता.