CSK vs KKR, IPL 2023 : चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या डावात खेळपट्टी संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात फिरकीला मदत मिळू शकते, त्यामुळे दोन्ही संघ प्रथम गोलंदाजी करण्यास उत्सुक होते. पण नाणेफेकीचा कौल धोनीने जिंकला. धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीच निर्णय घेतला.
धोनीने चेन्नईच्या संघात कोणताही बदल नसल्याचे सांगितले. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला होता. नीतीश राणा यानेही प्रथम फलंदाजी करण्याची इच्छा होती, असे नाणेफेकीनंतर सांगितले. कोलकात्याच्या संघात एक बदल केल्याचे नीतीश राणाने सांगितले. कोलकात्याने वैभव अरोरा याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेय. दोन्ही संघाची ताकद फिरकी गोलंदाजी आहे. चेन्नईच्या तुलनेत कोलकात्याची फिरकी अधिक मजबूत असल्याचे दिसतेय. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग ११ कशी आहे...
कोलकाता नाइट राइडर्स :
रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकुर, सुनील नारायण, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्स :
ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दूबे, मोइन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार / विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा.
चेन्नईचा संघ 12 सामन्यांमध्ये 15 गुणांसह प्लेऑफमध्ये जाण्याच्या तयारी आहे. तर दुसरीकडे केकेआर केवळ 10 गुणांसह उर्वरित दोन सामने जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तसेच, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी केकेआरला इतर संघांच्या कामगिरीकडेही लक्ष द्यावं लागणार आहे.
चेन्नई विरुद्ध कोलकाता हेड टू हेड -
आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ 27 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये चेन्नईनं 18 आणि केकेआरनं फक्त 9 जिंकले आहेत. तसेच, या दोघांमधील आजचा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. येथे दोन्ही संघ 9 वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये चेन्नईनं 7 आणि कोलकातानं फक्त 2 सामने जिंकले आहेत.