चेन्नई : आयपीएलमधील सर्व संघांनी रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. राजस्थान रॉयल्सचं कॅप्टनपद सोडून संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जमध्ये दाखल झाला आहे. चेन्नईनं संजू सॅमसनला 18 कोटी रुपयांमध्ये ट्रेड केलं. याचं कारणं गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सनं संजू सॅमसनला 18 कोटींमध्ये रिटेन केलं होतं. संजू सॅमसनच्या बदल्यात चेन्नईनं रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थानकडे पाठवलं. रवींद्र जडेजा 14 कोटी आणि सॅम करनसाठी 2.4 कोटी रुपये राजस्थान रॉयल्सनं मोजले. संजू सॅमसन राजस्थानचं कर्णधार पद सोडून आल्यानं चेन्नईचं कर्णधारपद कोणाकडे अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. चेन्नईनं एक पोस्ट करत सर्व स्पष्ट केलं आहे.
Chennai Super Kings Captain : चेन्नईचा कॅप्टन कोण?
चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद गेल्या दोन हंगामापासून ऋतुराज गायकवाडकडे आहे. गेल्या हंगामात ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्यानं महेंद्रसिंह धोनीला कर्णधारपद भूषवावं लागलं होतं. आता चेन्नई सुपर किंग्जके संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची साथ सोडून आला आहे. संजू सॅमसन राजस्थानचा कॅप्टन होता. त्यामुळं चेन्नईचं नेतृत्त्व त्याच्याकडे जाणार का अशा चर्चा होत्या. मात्र, चेन्नई सुपर किंग्जनं टीमचं नेतृत्त्व ऋतुराज गायकवाड करणार हे स्पष्ट केलं आहे. चेन्नई सुपर किंग्जला एका विकेटकीपर बॅटसमनची आवश्यकता होती, त्यामुळं त्यांनी संजू सॅमसनला ट्रेड करुन संघात घेतलं आहे. फलंदाजीमध्ये जेव्हा टीमला महेंद्रसिंह धोनीची गरज पडेल तेव्हा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून धोनी फलंदाजीसाठी मैदानावर उतरु शकतो.
संजू सॅमसन आयपीएलमध्ये 2012 मध्ये केकेआरमध्ये होता मात्र तो एकही सामना खेळला नाही. त्यानंतर राजस्थान रॉयल्सनं संजू सॅमसनला संधी दिली. पुढच्या काळात राजस्थानवर बंदी आली तेव्हा संजू सॅमसन दिल्ली डेअरडेविल्स संघातून खेळला. पुन्हा 2018 मध्ये संजू राजस्थानमध्ये आला. 2021 पासून 2025 पर्यंत संजू राजस्थानचा कॅप्टन होता. 2022 मध्ये त्यानं राजस्थानला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. आता संजू सॅमसन चेन्नईकडून खेळणार आहे.
CSK ची रिटेन्शन यादी: एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन (ट्रेड), शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस, आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, जेमी ओवर्टन, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, नाथन एलिस, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंह
CSK रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी: राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, शेख रशीद, रचिन रवींद्र, विजय शंकर, कमलेश नागरकोटी, मथीशा पाथिराना
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जकडे मिनी ऑक्शनसाठी 43.4 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्या पैशातून मिनी ऑक्शनमध्ये चेन्नई आणखी नऊ खेळाडूंना संघासोबत जोडून घेईल.